Disha Salian Case: खेळ तुम्ही सुरु केला, संपविणार आम्ही ; राणेंचा इशारा

येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असा इशारा सुद्धा राणेंनी काही दिवसापूर्वी दिला होता.
Disha Salian Case nitesh rane
Disha Salian Case nitesh ranesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दिशा सालियान मृत्यूप्रकरणात आक्षेपार्ह विधान करणं राणे पिता-पुत्रांना चांगलंच भोवलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर मुंबईतील मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राणे हे आज (शनिवारी) पोलिस ठाण्यात हजेरी लावणार आहेत. त्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी टि्वट करीत याप्रकरणाशी संबधितांना इशारा दिला आहे.

''खेळ तुम्ही सुरु केला..संपविणार आम्ही..न्याय मिळणार,'' असे टि्वट करीत (#JusticeForDishaSalian) नितेश राणेंनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असा इशारा सुद्धा राणेंनी काही दिवसापूर्वी दिला होता. आमच्याकडे पुरावे आहेत, ते आम्ही न्यायालयात सादर करु असे त्यांनी सांगितले आहे.

नितेश राणेंना ३ मार्चला, तर नारायण राणेंना ४ मार्चला हजर राहण्यासाठीची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, दिलेल्या तारखेला नारायण राणे आणि नितेश राणे चौकशी हजर राहिले नाहीत. पण आज (शनिवारी) नारायण राणे आणि नितेश राणे मालवणी पोलिसांसमोर हजर राहणार आहेत. त्यापूर्वी दिंडोशी कोर्टाने नारायण राणे आणि नितेश राणेंना दिलासा देऊन १० मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर दिशा सालीयनचा  मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आलं आणि राणेंनी थेट राज्यातील एका युवा मंत्र्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या तक्रारीवरून हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे .

Disha Salian Case nitesh rane
russia ukraine war :राष्ट्राध्यक्ष झेलेस्कींना मारण्याचा प्रयत्न

''दिशा सालियनवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्या वेळी एका मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. मालवणी पोलीस ठाण्यातून महिला आयोगाने दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल मागवला होता. त्या अहवालात दिशा सालियनच्या शवविच्छेदनाचा अहवालाचा समावेश आहे. दिशा सालियनवर बलात्कार झाल्याचा शवविच्छेद अहवालामध्ये उल्लेख नाही. यानंतर नारायण राणे यांच्यावर महिला आयोगाने खोटे आरोप केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com