APP देशाचा आठवा राष्ट्रीय पक्ष ? ; गुजरात, हिमाचलच्या निकालापूर्वीच झळकला फलक

APP national party : सध्या काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, टीएमसी हे सध्या राष्ट्रीय पक्ष आहेत.
APP national party  latest news
APP national party latest newssarkarnama

APP national party : दिल्ली महानगरपालिकेवर झेंडा फडकविल्यानंतर आम आदमी पक्षाचे गुजरात आणि हिमाचलमध्ये काय होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर गुजरात आणि हिमाचलमध्ये निकालानंतर आपच्या माध्यमातून देशाला नवा राष्ट्रीय पक्ष मिळणार का, हे दुपारी स्पष्ट होईल. (gaujrat election result 2022 live updates counting votes bjp aap congress latest news)

हिमाचल आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशाचा आठवा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा आपचा मार्ग होणार आहे. सध्या काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, टीएमसी हे सध्या राष्ट्रीय पक्ष आहेत आपचा आठवा पक्ष म्हणून एन्ट्री होणार आहे.

दोन्ही राज्याच्या निकाल लागण्याच्या पूर्वीच आम आदमी पक्षाने स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून जाहीर केलं आहे. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कोणत्याही पक्षाला चार राज्यात ६ टक्के मतदान आणि दोन विधानसभा जागेवर निवडून यावं लागतं.

आम आदमी पक्षाने दिल्ली, पंजाब आणि गोव्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा या अगोदरच मिळवला आहे. त्यानंतर आम आदमी पक्षाला हा विश्वास आहे की, आम आदमी पक्ष गुजरात मध्ये ६ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान मिळवेल, त्यामुळं आम आदमी पक्षाने त्या अगोदरच दिल्ली येथील कार्यालयात राष्ट्रीय पक्षाचा बोर्ड लावला आहे.पक्ष कार्यालयाबाहेर आभाराचे बॅनर लावण्यात आले आहेत.

राष्ट्रीय पक्ष होण्याचे काय आहेत निकष

  • ४ राज्यात ६ टक्क्यापेक्षा अधिक मतदान

  • ४ राज्यात २ विधानसभा जागेवर निवडून येणं

  • दिल्ली, गोवा आणि पंजाब मध्ये आम आदमी पक्षाने हा निकष पूर्ण केला आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com