Gujarat Election 2022 : बंडखोरांनी वाढवलं टेन्शन ; निवडणुकीत भाजपचा खेळ बिघडविणार ?

Gujarat Election 2022 : १९ बंडखोर नेत्यांना भाजपनं केलं निलंबित..
Narendra Modi, Amit Shah, Gujrat Election 2022 Latest News
Narendra Modi, Amit Shah, Gujrat Election 2022 Latest NewsSarkarnama

Gujarat Election 2022 : गुजरात निवडणुकीत भाजपसमोर बंडखोर आमदारांचे आव्हान आहे. तिकीट न दिल्याने १८ जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांनी थेट भाजपच्याच उमेदवारांसमोर दंड थोपटल्यामुळे भाजपची डोकेदुःखी वाढली आहे. या सर्व बंडखोरांना भाजपने निलंबित केलं आहे.

बंडखोर उमेदवारांमध्ये वाघोडिया येथून 'बाहुबली' आमदार मधु श्रीवास्तव यांच्याही समावेश आहे. आत्तापर्यंत १९ बंडखोर नेत्यांना भाजपने निलंबित केले आहे. दिनू पटेल, मधु श्रीवास्तव, कुलदीप सिंह उदय सिंह राऊल, खतु पगी, एसएम खांट, जेपी पटेल, रमेश झाला, अमरीश झाला, धवलसिंह झाला, रामसिंह शंकर ठाकोर, मावजी देसाई, लेबजी ठाकोर आदींना भाजपने घरचा रस्ता दाखवला आहे.

Narendra Modi, Amit Shah, Gujrat Election 2022 Latest News
Gujarat Elections 2022 : विद्यार्थिनींना स्कुटी, ज्येष्ठ महिलांना मोफत बस प्रवास ; भाजपचा जाहीरनामा

बंडखोरीचे प्रमाण हे भाजपसोबत कॉंग्रेसमध्ये काही प्रमाणात आहे, पण सगळ्यात मोठा फटका हा भाजपला बसला आहे. भाजपने अनेक आमदारांचे तिकीट कापल्याने पक्षात नाराजी निर्माण झाली, त्यानंतर बंडखोरीला प्रारंभ झाला.

वाघोडिया मतदार संघातून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले मधु श्रीवास्तव यांने तिकीट कापून अश्विनी पटेल यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे श्रीवास्तव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत बंडखोरी केली आहे.

Narendra Modi, Amit Shah, Gujrat Election 2022 Latest News
Abdul Sattar : गुवाहाटी दौऱ्याकडे पाठ फिरवणारे सत्तार नाराज ? ; सत्तार म्हणाले..

भाजपने तिकीट कापलेले केसरी सिंह हे आम आदमी पार्टीमध्ये सहभागी झाले आहेत. कॉंग्रेसमधील १७ बंडखोरांना भाजपने तिकीट दिले आहे. भाजपचे अनेक बंडखोर नेत्यांनी रिंगणात उतरवले आहेत. हे बंडखोरच भाजपचा खेळ बिघडविणार असे चित्र सध्या गुजरातमध्ये दिसते.

बडोदा सध्या गुजरात निवडणुकीत बंडखोरांचे केंद्रस्थान झाले आहे. बडोदाच्या तेरा विधानसभा जागांपैकी तीन बंडखोर आमदारांनी भाजपचे टेन्शन वाढवली आहे. बंडखोरांची मनधरणी करण्याचे काम सध्या ज्येष्ठ नेते करीत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नाला यश येत नसल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली असती तर विचार केला असता, असे बंडखोरांचे म्हणणं आहे.

२०१७च्या निवडणुकीत बडोदामध्ये भाजपला ९ तर कॉंग्रेसला ४ जागा मिळाल्या होत्या. पण या निवडणुकीत आम आदमी पार्टीही आपले नशीब आजमावत आहे. सहा वेळा आमदार राहिलेले मधु श्रीवास्तव म्हणाले, 'मी १९९५ मध्ये अपक्ष निवडणूक लढवून जिंकली होती. त्यानंतर भाजपने ५ वेळा मला बोलावून तिकीट दिले पण या निवडणुकीत तिकीट दिले नाही. त्यामुळे मी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. मोठ्या मताधिक्क्याने मी निवडून येईल,"

आपल्या पक्षातील बंडखोरांबाबत काँग्रेसने म्हटलं आहे की कॉंग्रेस हा शिस्तप्रिय पक्ष आहे. गेल्या २७ वर्षात गुजराजमध्ये भाजप आणि येथील जनता हे एकमेकांमध्ये लढत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस बहुमताने गुजरातमध्ये सत्तेत येईल.

या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपचे १८ बंडखोरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे २०२२ ची निवडणूक ही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरेल, तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच गुजरात विधानसभेत एन्ट्री केल्याने ही निवडणूक भाजपसाठी अटीतटींची होणार आहे, यात शंका नाही. आपची एन्ट्री ही कॉंग्रेस आणि भाजपसाठी मोठे आव्हान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com