
हेमंत पवार
कऱ्हाड : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्याची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी भाजप-विरोधकांचे वार-पलटवार सुरु आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या प्रचारावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतांची भीक मागण्यासाठी फिरावे लागत आहे, अशी जहरी टीका पटोलेंनी केली आहे.
संविधान बचाव पदयात्रेच्या सांगता सभेसाठी पटोले कऱ्हाड (जि.सातारा) येथे आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी पत्रकारांशी बोलत होते. पटोले म्हणाले, "गुजरातच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा बुथ ताब्यात घेवुन मतदान केले जात आहे, असा एक व्हीडीओ मी पाहिला. देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री गुजरातच्या गल्लोगल्ली फिरुन मताची भीक मागत आहेत. गुजरातच्या जनतेने भाजपला बाजुला टाकण्याचे काम सुरु केले आहे. देशाच्या पंतप्रधानांना मतांची भीक मागण्यासाठी फिरावे लागत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्ष पुढे येईल,"
"सातारा जिल्ह्याने या देशाला,राज्याला खूप काही दिले आहे. आत्ता सातारा जिल्ह्याचा माणूस ज्या जाळ्यात फसला आहे, त्यातून त्यांनी बाहेर यावे,"असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता पटोलेंना लगावला.
"धर्मावर आधारीत राजकारण करुन १० लाख अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती थांबवली गेली आहे. ही संविधानात जे अधिकार दिले आहेत, त्याला त्यापासून दुर ठेवणे म्हणजे भारत एकसंध आहे का ? मुठभर लोकांना न्याय मिळून सामान्य लोकांना लुटले जात आहे. सामान्य लोकांसाठी, सर्व धर्माच्या लोकांसाठी आम्ही संविधानाच्या आधारावर कॉंग्रेस काम करीत आहेत," असे पटोले म्हणाले.
"देशाला एकसंध ठेवण्यासाठी राहुल गांधीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. ज्या देशातील न्यायाधीश स्वतःला न्याय मिळावा, असे माध्यमांपुढे जाऊन म्हणत असेल तर सरकारचा न्यायव्यवस्थेवर किती दबाव आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संविधान, देश एकत्रीत आहे, असे म्हणणाऱ्या लोकांना त्याचे उत्तर विचारले पाहिजे. कॉंग्रेस लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. आम्ही विचाराने लढणार आहोत," असे पटोले म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार वजाहत मिर्झा, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, मनोहर शिंदे, झाकीर पठाण, इंद्रजीत गुजर, आप्पासाहेब माने यावेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.