गुलाम नबी आझाद धमाका करणार : काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत

गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Aazad) धमका करण्याच्या तयारीत
ghulam nabi azad
ghulam nabi azadsarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (Gulab Nabi Aazad) धमका करण्याच्या तयारीत आहेत. ते काँग्रेसला (Congress) लवकरच एक धक्का देणार असल्याचे संकेत त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले. गुलाम नबी आझाद मागच्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असून त्यांनी सातत्याने पक्षावर आणि पक्ष नेतृत्वार आगपाखड केली आहे. ते काँग्रेसमधील बंडखोर गट असलेल्या G-23 चे नेते आहेत. त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता, या पार्श्वभू्मीवर ते माध्यमांशी बोलत होते.

आझाद यांना माध्यमांनी तुम्ही पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा कितपत खऱ्या आहेत याबाबातीत विचारले असता ते म्हणाले, सध्या नवीन पक्ष स्थापन करण्याचा विचार नाही, पण भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही. यावेळी काँग्रेसवर टिका करताना ते म्हणाले, सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाकडे चुका आणि कमतरता या गोष्टी ऐकण्याची क्षमता नाही, पण दूसऱ्या बाजूला इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे चुका सांगण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करायचे. आणि आम्ही त्या वेळोवेळी सांगायचो.

ghulam nabi azad
भाजपत गेलेल्या गवस यांनी एकाच दिवसात ३६ लाखांची थकबाकी कशी भरली?

आजच्या काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देणं हे धाडसाचे काम आहे का? यावर बोलताना ते म्हणाले, यात आव्हान देण्यात विषेश असे काही नाही. फक्त तेव्हा नेतृत्व ऐकायचे आताचे ऐकत नाहीत हाच फरक आहे. एक जुनी आठवण सांगताना आझाद म्हणाले, मी युथ काँग्रेसमध्ये दोन सरचिटणीसांची नियुक्ती करण्यास नकार दिला होता. त्यावर इंदिरा गांधीनी "किप इट अप" म्हणत माझ्या निर्णयांना बरोबर म्हंटले होते. पण आज कोणाची ऐकायची तयारी नाही.

काँग्रेसच्या जी-23 नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, शशी थरूर, भूपेंद्रसिंह हूडा, आनंद शर्मा, मनिश तिवारी आणि पी.चिदंबरम आदी नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्व निवडीसाठी निवडणूका घ्याव्यात, गांधी घराण्याच्या बाहेरचे नेतृत्व निवडावे अशी मागणी या बंडखोर नेत्यांची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com