Niti Ayog (Delhi) : देशामध्ये नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणूच्या संसर्गाने आता चिंता वाढली आहे. यामुळे आता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत या संसर्गामुळे देशामध्ये दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा संसर्ग दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. सर्दी, ताप, आणि खोकला हा आजारात वाढ होत आहे. ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही या विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आहेत.
H3N2 Influenza : मास्क वापरण्याचं आवाहन :
या विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली असताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्राकडून विविध राज्यांना पत्र पाठवण्याते आले आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला देण्यात आला आहे. सर्व राज्यांनी आवश्यक तेवढे औषधांचा पुरेश्या प्रमाणात औषधांची उपलतब्धतेची दक्षता घ्यावी, लक्षणे असलेल्या रूग्णांचं योग्य तऱ्हेने निरीक्षण करा, असे आदेश देण्यात आलेले आहे.
H3N2 Virus and Coronavirus : कोरोनासारखा पसरतो इन्फ्लुएंझा विषाणू :
सद्यस्थितीत कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये घट झालेली आहे. असे असले तरी, मात्र या नव्या विषाणूने आता चिंता वाढवली आहे. हवामानातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला व झुलाब या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. औषधोपचार नंतरही अनेकांना खोकल्यापासून संपूर्णपणे समाधान होताना दिसत नाही.
H3N2 Influenza Death in India : H3N2 इन्फ्लुएंझा विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू :
H3N2 इन्फ्लूएंझा य़ा विषाणूचा संसर्ग होऊन हरियाणा आणि कर्नाटक राज्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता राज्य आणि केंद्र सरकार सतर्क झाले आहे. यामुळे आता कोरोनाप्रमाणे विषाणू (Coronavirus) प्रमाणेच थैमान माजवेल का? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता, योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
H3N2 Virus Symtoms : H3N2 विषाणू संसर्गाची लक्षणं :
H3N2 इन्फ्लूएंझा हा एक व्हायरल फ्लू आहे. या फ्ल्यू ची लक्षणे कोरोनासाऱखीच असतात. ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची लक्षणे आहेत.
H3N2 Virus Precaution : H3N2 व्हायरसपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?
H3N2 या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार साबणाने स्वच्छ हात धुवून आणि फिजिकल डिस्टंस राखण्याचा, सल्ला तज्ञ डॉक्टरांनी देण्यात आला आहे. मात्र IMA ने या विषाणूच्या संसर्गित व्यक्तिला अँटीबायोटिक घेणं टाळलं पाहिजे, सल्ला दिला आहे.
हात नियमितपणे स्वच्छ धुवा. विशेषत: शौचानंतर, जेवणाआधी हात स्वच्छ धुवावे. तसेच चेहरा किंवा नाकाला वारंवार स्पर्श करणे टाळावे. आजारी व्यक्तींपासून दूर राहा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.