गड आला पण सिंह गेला! महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली पण आपल्याच वॉर्डात 5 मतांनी हरला

नवीन पक्ष स्थापन करून तीनच महिन्यांत महापालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.
Hamro Party Ajoy Edwards
Hamro Party Ajoy Edwards Sarkarnama
Published on
Updated on

दार्जिलिंग : नवीन पक्ष स्थापन करून रेस्टॉरन्टचे मालक असलेल्या अजोय एडवर्ड्स (Ajoy Edwards) यांनी तीनच महिन्यात एकहाती महापालिकेची सत्ता मिळवली आहे. हा प्रकार दार्जिलिंग (Darjeeling) महापालिकेत घडला आहे. दार्जिलिंग महापालिकेतील 32 पैकी 18 जागा एडवर्ड्स यांच्या हमरो पार्टीला मिळाल्या आहेत. अजोय एडवर्ड्स यांनी हा अभूतपूर्व विजय मिळवला असला तरी त्यांना केवळ 5 मतांनी त्यांच्यात वॉर्डात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

एडवर्ड्स हे वॉर्ड क्रमांक 22 मधून मैदानात उतरले होते. त्यांचा 5 मतांनी पराभव झाला आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या उमेदवाराने हा पराभव केला आहे. यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती हमरो पार्टीची झाली आहे. एडवर्ड्स याच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांच्या पक्षाला अल्पावधीत एवढे मोठे यश मिळाले आहे, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले. पाच मुलांचे पिता असलेले एडवर्ड्स हे मागील काही दशके समाजकार्यात सक्रिया आहेत. एडवर्ड्स फाऊंडेशनच्या माध्यमातून ते समाजसेवा करीत आहेत.

Hamro Party Ajoy Edwards
'यूपी'त मोठं नाट्य : योगींचे कार्यकर्ते निषेधासाठी येताच ममता थेट रस्त्यात जाऊन भिडल्या!

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 108 महापालिका आणि नगरपालिकांपैकी 102 ठिकाणी विजय मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसला दार्जिलिंगमध्ये केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. हमारो पार्टीच्या या अनोख्या यशाची आता चर्चा होत आहे. एडवर्ड्स यांनी केवळ तीन महिन्यांपूर्वी हमरो पार्टीची स्थापना केली होती. त्यानंतर लगेचच त्यांनी महापालिकेत सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर बोलताना एडवर्ड्स म्हणाले की, महापालिकेचे नेतृत्व करण्यासाठी दार्जिलिंगच्या नागरिकांना प्रामाणिक लोक हवे आहेत, हे सिद्ध करणारा आमचा विजय आहे. (Latest Political News in Marathi)

Hamro Party Ajoy Edwards
महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेच्या यशवंत जाधवांसह तीन नेत्यांचा पाय खोलात

राज्यातील 108 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांपैकी (Civic Polls) 102 ठिकाणी तृणमूल काँग्रेसने (TMC) विजय मिळवला आहे. डाव्यांना केवळ एका ठिकाणी विजय मिळाला असून, भाजप आणि काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासमोर सगळे विरोधी पक्ष हतबल झाले आहेत. डाव्या पक्षांनी एकमेव विजय मिळवला असून, ताहेरपूर महापालिकेत त्यांनी विजय मिळवला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत 77 जागा जिंकून भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. परंतु, भाजपला (BJP) आता एकाही ठिकाणी सत्ता मिळवता आलेली नाही. काँग्रेसचीही (Congress) तीच अवस्था आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com