Lado Laxmi Yojana: एप्रिलपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये; हरियाणा सरकारचा निर्णय

Haryana Government Scheme Lado Laxmi Yojana:मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत विरोधकांनी लाडो लक्ष्मी योजनेच्या निधी वाटपास उशीर होत असल्याचा मुद्दा मांडला
Lado Laxmi Yojana
Lado Laxmi YojanaSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने काही नियम आणि पात्रतेत बदल केले आहेत. तर दुसरीकडे हरियाणामध्ये अशाच प्रकारची 'लाडो लक्ष्मी योजना'बाबत नवीन अपडेट समोर येत आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. 'लाडो लक्ष्मी योजना'बाबत महत्वपूर्ण चर्चा झाली.

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत विरोधकांनी लाडो लक्ष्मी योजनेच्या निधी वाटपास उशीर होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर येत्या बजेटमध्ये या योजनेबाबत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, पात्र महिलांना एप्रिल महिन्यात योजनेची रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले.

Lado Laxmi Yojana
Supriya Sule: शिवसेना अन् राष्ट्रवादी का फुटली? सुप्रियाताईंनी सांगितली इनसाईड स्टोरी

24 हजार कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे आता नोकरीत कायम नसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काय होणार, याबाबत बैठकीत चर्चा झाली. नवीन कर्मचारी भरती करताना जुन्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.यापुढे नवीन भरती करताना जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Lado Laxmi Yojana
Maharashtra Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी? दोन नावं आघाडीवर; पटोलेंवर काय जबाबदारी...

लाडो लक्ष्मी योजना'मध्ये गरीब महिलांना दरमहिन्याला 2100 रुपये दिले जातात. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होते. 1लाख 80 हजार वार्षिक उपन्न असणाऱ्या महिालांना या योजनेचा लाभ मिळतो. राज्याच्या बजेटची तारीख ठरविण्यासाठी मुख्यमंत्री सैनी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com