Haryana Politics : हरियाणात विधानसभा निवडणुकीआधीच 'या' प्रमुख पक्षाला धक्के; दोनच दिवसांत चार आमदारांचे राजीनामे!

Haryana Vidhan Sabha Election : राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी दोन माजी मंत्री आहेत ; हरियाणामध्ये एकाच टप्प्यात 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
Haryana Vidhan Sabha Election
Haryana Vidhan Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Jananayak Janata Party News : जम्मू-काश्मीरसोबतच हरियाणा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या दोन्ही राज्यांमधील निवडणूकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यात 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे आणि दोन्ही राज्यांतील मतमोजणी 4 ऑक्टोबर रोजी होईल. मात्र तत्पुर्वीच हरिणायामधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या जननायक जनता पार्टीली मोठे धक्के बसले आहेत.

माजी पंचायतमंत्री टोहना येथील आमदार देवेंदर बबली यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पक्ष अध्यक्ष अजय चौटाला यांना पत्र पाठवून सर्व पदांचा राजीनामा सोपवला आहे.

तसेच कैथल येथील गुहला आरक्षित विधानसभा मतदारसंघातून 2019मध्ये 'जजपा'कडून विजयी झालेले, ईश्वर सिंह यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. विद्यमाना आमदार ईश्वर सिंह यांनी जजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अजय चौटाला यांना लेखी राजीनामा सोपवला आहे.

Haryana Vidhan Sabha Election
Goa Minister Aleixo Sequeira News : 'ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सरकारी खात्यात..' ; गोव्याच्या कायदा मंत्र्यांचं आणखी एक विधान!

याशिवाय शाहबादचे आमदार रामकरण यांनीही पक्षाचा राजीनामा सोपवला आहे. पक्षाला दोन दिवसांत चार आमदारांनी राजीनामा सोपवला आहे. ईश्वर सिंह आणि रामकरण यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.

उकलाना येथील आमदार आणि माजी मंत्री अनूप धानक यांनी जननायक जनता पार्टीच्या सर्व जबाबदाऱ्या आणि पदांचा राजीनामा दिला आहे. आमदार अनूप धानक यांनी आचारसिंहता लागू होण्याच्या दोन तासांमध्येच ही घोषणा केली होती. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय सिंह चौटाला यांना आपला राजीनामा पाठवला होता.

Haryana Vidhan Sabha Election
Pramod Sawant News : गोव्याची CM प्रमोद सावंतांनी वाट लावली, राज्याला 'ड्रग कॅपिटल' केलं

अनूप धानक यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला सर्वाधिक नुकसान पोहचले आहे. त्यांना पक्षाचे सर्वात निष्ठावान म्हणून ओळखले जात होते. हिसारमध्ये जजपाचे तीन आमदार आहेत, ज्यामध्ये तिघेही आता पक्षाच्या विरोधात झाले आहेत. नारनौदचे आमदार रामकुमार गौतम सर्वात आधी बंडखोर झाले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com