तीन दिवसांत महाविकास आघाडीच्या चार नेत्यांचा 'निकाल' लागणार

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
Hasan Mushrif, Kishori Pednekar, Anil Parab
Hasan Mushrif, Kishori Pednekar, Anil ParabSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी काही नेत्यांविरोधात न्यायालयातही धाव घेतली आहे. तसेच काही नेत्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिली असून त्याचा पाठपुरावाही ते सातत्याने करत आहेत. आता हा आठवडा आघाडीतील चार नेत्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे.

किरीट सोमय्या यांनीच याबाबत माहिती दिली आहे. सोमय्या यांनी या चार नेत्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी आजपासून (ता. 28) तीन दिवस असणार आहे. आज हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या साखर कारखान्याशी संबंधित सुनावणी पुण्यात होणार आहे. तसेच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori Pednekar) यांच्या किश कॉर्पोरेटबाबतची सुनावणी मुंबईतील सत्र न्यायालयात आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे भागीदार असलेल्या सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणीही मुंबई न्यायालयात होणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

Hasan Mushrif, Kishori Pednekar, Anil Parab
भाजपशी पंगा घेणं मित्रपक्षाला महागात; तीनही आमदार फोडत दिला दणका

सुजित पाटकर यांच्याशी संबंधित तक्रारीची सुनावणी मंगळवारीही (ता. 29) मुंबईतील न्यायालयात होणार आहे. तर अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टबाबतची तक्रारीची सुनावणी दापोली न्यायालयात बुधवारी (ता. 30) होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितलं. त्यामुळे तीन दिवसांत पाच सुनावण्या होणार असून त्यामध्ये महाविकास आघाडीतील चार नेत्यांचा संबंध आहे.

श्रीधर पाटणकरांवर कारवाई अन्य सोमय्या आक्रमक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar)यांच्यावर मागील आठवड्यात मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडीने (ED) कारवाई केली आहे. ईडीने पाटणकर यांचे ठाण्यातील कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट्स जप्त केले. या कारवाई केल्यानंतर किरीट सोमय्या हे आक्रमक झाले आहेत. ''ईडीने काल जो व्यवहार समोर आणला आहे त्यानुसार ३० कोटी रुपयांचं मनी लॉन्डरिंग झालं आहे. सगळी प्रकरणे बाहेर आली तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे. नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedi)आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय,'' असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

''2014 मध्ये एक शेल कंपनी स्थापन केली त्यात आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे संचालक आहेत. या कंपनीत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी कधी मनी लॅाडरिंग केले आहे का? आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी स्थापन केलेली कंपनी आज हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीची आहे, हा व्यवहार का झाला, कसा झाला,'' असा प्रश्न सोमय्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com