Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत चालताना हृदयविकाराचा झटका; काँग्रेस खासदाराचा मृत्यू

जालंधरचे काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांना हृदयविकाराचा झटका आला.
MP Santokh Singh Chaudhary
MP Santokh Singh ChaudharySarkarnama
Published on
Updated on

चंदीगड : भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबर चालत असताना जालंधरचे काँग्रेसचे (Congress) खासदार संतोख सिंह चौधरी (Santokh Singh Chaudhari) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. खासदार चौधरी हे ७६ वर्षांचे होते. दरम्यान, चौधरी यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आली आहे. (Heart attack while walking in Bharat Jodo Yatra; Death of Congress MP)

भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमधून मार्गाक्रमण करत आहे. त्यात पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी सहभागी झाले होते. फगवाडाजवळील भाटिया गावाजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला. चौधरी यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. संतोख सिंह चौधरी हे दोआबातील प्रमुख दलित नेते होते. ते दुसऱ्यांदा खासदार झाले होते. संतोख चौधरी हे पंजाबमध्ये मंत्री होते. पंजाबचे पहिले शिक्षणमंत्री मास्टर गुरबंता सिंह यांचे ते पुत्र होते. त्यांचे पुत्र विक्रमजीत सिंह चौधरी हे फिल्लौरचे आमदार आहेत.

MP Santokh Singh Chaudhary
Satyajit Tambe News : तांबेंचं 'पितळ' उघड ; अजितदादांनी केला थोरातांबाबत मोठा गौप्यस्फोट

खासदार संतोख सिंह चौधरी हे २०१४ मध्ये अकाली दलाच्या पवनकुमार टिनू यांचा पराभव करून लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते. ते २००४ ते २०१० पर्यंत पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. काँग्रेस सरकारच्या काळात २००२ मध्ये ते सामाजिक सुरक्षा, महिला व बालविकास, समाजकल्याण, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन खात्याचे मंत्री होते. काँग्रेसच्या तिकीटावर २००२ मध्ये त्यांनी फिल्लौर विधानसभेची जागा जिंकली होती. त्यावेळीही त्यांनी अकाली दलाच्या सर्वन सिंग यांचा पराभव केला होता.

MP Santokh Singh Chaudhary
Kadam Vs Jadhav : गुहागरचा पुढचा आमदार शिंदे गटाचा करण्याची जबाबदारी माझी : रामदास कदमांचे जाधवांना चॅलेंज

दरम्यान, महाराष्ट्रातील नांदेडमध्ये भारत जोडो यात्रा आल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेस नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. कृष्ण कुमार पांडे असे नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेत मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस नेत्याचे नाव होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com