Hijab Controversy हिजाबसोबत भगव्या उपरण्यावरही बंदी; उच्च न्यायालयाचा दणका

हिजाब वाद चिघळल्यानंतर राज्यातील शाळा महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
karnatak High Court
karnatak High Court

बंगळूर: हिजाब वाद (Hijab Controversy) प्रकरण तीन सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्यानंतर आज उच्च न्यायालयात (high court) सुनावणी पार पडली. तीन सदस्यीय खंडपीठाने राज्य सरकारला शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना भगवी शाल, स्कार्फ, हिजाब (Hijab) आणि वर्गात कोणताही धार्मिक ध्वज बाळगण्यास परवानगी न देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Hijab Controversy latest news update)

- हिजाब प्रकरण तीन सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग

उच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, न्यायाधिशांनी हिजाब प्रकरण तीन सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने मुलींना हिजाब (Hijab) परिधान करून महाविद्यालयात जाण्याची परवानगी देणारे अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. अंतरिम दिलासा मोठ्या खंडपीठाने विचारात घ्यावा, असे सांगत त्यांनी हे प्रकरण उच्चस्तरीय खंडपीठाकडे वर्ग केले. मात्र याचिकाकर्त्याने मोठ्या खंडपीठाला विरोध करत हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी केली.

karnatak High Court
हिजाबबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय ; याचिकाकर्त्याला झटका, वकीलांनी खडसावले

- सर्वोच्च न्यायालायाचा निकाल

त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालायातही आज सुनावणी पार पडली. ''योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल. कर्नाटकात काय होत आहे, यावर आमचं लक्ष आहे, हा राष्ट्रीय पातळीवरील मुद्दा बनवू नका आणि योग्यवेळी त्यात हस्तक्षेप केला जाईल. हिजाबचा मुद्द्याला धार्मिक आणि राजकीय बनवू नका, असे सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

- वाद चिघळल्यानंतर कर्नाटकात तीन दिवस शाळा, महाविद्यालये बंद

हिजाब वाद चिघळल्यानंतर राज्यातील शाळा महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली होती. कर्नाटकात हिजाबचा वाद पेटल्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शाळा (School) व महाविद्यालयांमध्ये (Colleges) वादाचे प्रसंग घडत असून तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभुमूवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मंगळवारी मोठा निर्णय घेतला.

राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा (Hijab) घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बोम्मई यांनी मंगळवारी राज्यातील शाळा व महाविद्यालये पुढील तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा करावी लागली. विद्यार्थी शिक्षक आणि शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापन तसेच कर्नाटकमधील नागरिकांनीही राज्यात शांतता राखावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. दरम्यान, काही महाविद्यालयांमध्ये मंगळवारी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com