Himachal Pradesh : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका ; नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

Himachal Pradesh : हिमाचल विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय निश्चित, असे नड्डा म्हणाले.
Himachal Pradesh : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका ; नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

शिमला (Simala) : हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राज्य काँग्रेस कमिटी माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर खंड (Dharmpal Thakur Khand) या बड्या नेत्यासह अनेक काँग्रेस नेत्यांचा सोमवारी (ता.७) भाजप प्रवेश झाला, याचे नुकसान काँग्रेसला होणार असल्याचे बोलले जात आहे.

Himachal Pradesh : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका ; नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!
मोठी बातमी : EWS आरक्षणावर शिक्कामोर्तब ; पाचपैकी चार न्यायाधीशांचे एकमत

काँग्रेसच्या जवळपास 26 नेत्यांचा सत्तेत असलेल्या भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. निवडणुक तोंडावर असताना काँग्रेस नेत्यांचे भाजपमध्ये डेरेदाखल होणे हा काँग्रेसला नुकसानीचे आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे नेते सुधन सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी ते म्हणाले की, भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्र काम करणार आहोत.

Himachal Pradesh : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका ; नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!
गोपालगंजमध्ये भाजपचा विजय; ओवेसींनी घेतला तेजस्वी यादवांचा बदला

दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय निश्चित असल्याचे, याआधीच म्हंटले आहे. नड्डा म्हणाले की, हिमाचलमधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचंही त्यांनी प्रशंसा केली. त्यांनी काही चांगल्या योजना, चांगली धोरणे जमीनावर राबविल्याचे सांगितले. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com