Himachal Pradesh Election : निवडणुका जाहीर, एकाच टप्प्यात होणार मतदान!

Himachal Pradesh : काही मतदान केंद्रे फक्त महिलांकडून चालवण्यात येईल.
Rajiv Kumar
Rajiv KumarSarkarnama

दिल्ली : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh Election) राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणुकीबाबत घोषणा केली. पहाडी राज्यात एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, हिमाचलमध्ये 17 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल, ज्यामध्ये विधानसभेच्या 68 जागा आहेत. उमेदवारांना 25 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 27 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी मागे घेता येणार आहेत. 12 नोव्हेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Rajiv Kumar
सत्तेचा गैरवापर कोणी केला याचे आत्मपरिक्षण करा : विखे पाटलांची ठाकरेंवर टीका!

ऑक्टोबर हा सणांचा महिना आहे, या महिन्याट लोकशाहीचा सणही जोडला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आयोगाने गेल्या अनेक महिन्यांपासून यासाठी विशेष तयारी केली आहे. कोरोना साथीचा धोकाही लक्षात घेऊन, यासाठी तयारी करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ 8 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. एकूण 55 लाख मतदार आहेत. त्यापैकी १५ लाख मतदार मतपत्रिकेद्वारे मतदान करणार आहेत. तर 1.6 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

राजीव कुमार म्हणाले की, मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात नवीन मतदारांची भर पडली आहे. चुका दुरुस्त केल्या आहेत. शहरांमध्ये मतदान वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे उदाहरणही त्यांनी दिले. जेथे मेट्रो शहरांमध्ये मतदान कमी होते. ज्या भागात पूर्वी कमी मतदान झाले आहे, त्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी सर्वच विधानसभा मतदारसंघात प्रयत्न सुरू आहेत. कोणाकडे मतदार ओळखपत्र नसले, तरी ते इतर कागदपत्रांच्या मदतीने मतदान करू शकतात, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

Rajiv Kumar
जेथे बाळासाहेब ठाकरे-मोदींचा फोटो होता, तेथे आता सोनिया गांधी आणि पवारांचा फोटो आहे...

मतदान केंद्र व्यवस्था :

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, प्रत्येक बूथवर मतदारासांठी रॅम्प असेल. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक बूथ हे तळमजल्यावर असेल. मतदारांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. काही मतदान केंद्रे फक्त महिलांकडून चालवण्यात येईल. प्रत्येक विधानसभेत असे किमान एक तरी बूथ असेल. त्यातून महिला सक्षमीकरणाचे घडण्याचा प्रयत्न असणार आहे. काही मतदान केंद्रे वेगळ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे हाताळली जातील.

बॅलेट पेपरची व्यवस्था :

वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. पारदर्शक काम करण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाईल. मतदानाच्या गोपनीयतेशी तडजोड न करता ही प्रक्रिया पार पाडली जाईल, असे आयुक्त म्हणाले.

तक्रार सुविधा व 60 मिनिटांत दखल :

निवडणुकीत मतदारांच्या सोयीसाठी आणि निवडणूक प्रक्रिया कोणाच्याही हस्तक्षेपमुक्त ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. व्हिजिलिंस अॅपद्वारे कोणताही मतदार तक्रार करू शकतो. आमची टीम 60 मिनिटांत पोहोचेल आणि 90 मिनिटांत तक्रारीचे निवारण करेल. दिव्यांग मतदारही अॅप वापरू शकतात. केवायसी अॅपद्वारे मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळू शकेल. त्याच्यावर काही फौजदारी खटला असेल तर त्याचीही संपूर्ण माहिती असेल, असे आयुक्त म्हणाले.

खोट्या बातम्यांकडे लक्ष द्या :

प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासल्यानंतर माहिती आणि बातम्या प्रकाशित करण्याचा सल्ला आयुक्तांनी दिला. खोट्या बातम्यांवर प्रतिबंध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

2017 मध्ये हिमाचलमधील पक्षीय बलाबल :

68 जागांच्या हिमाचल विधानसभेची मुदत जानेवारी 2023 मध्ये संपत आहे. यापूर्वी राज्यात निवडणुका होणार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 44 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. 3 जागा इतरांच्या राखले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com