मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूकीत वेगवेगळ्या घडामोडी घडून येत आहेत. राज्यात सत्तापालट झाल्यानंतरची ही निवडणूक सर्वांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राधाकृष्ण पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ते निवडणूक हारले तरी लटके यांचा उद्धार सरकारने कशाला करावा. त्यांचा काय उद्धार करायचा तो उद्धव ठाकरे करतील. सत्तेचा गैरवापर कोणी केला, हे मागे वळून बघा लक्षात येईल. सध्यातरी उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असे विखे पाटील यांनी म्हंटले.
ठाकरे गटाचे जे काही राजकारण सुरू आहे, याबाबत विचार होण्याची आवश्यकता आहे. आपण सत्तेसाठी कोणत्या लोकांसोबत गेलो. औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहणाऱ्या लोकांचा इथे सत्कार करण्यात येतो. सत्तेचा गैरवापर कोण करत आहे, याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
मंत्री विखे पाटील नाशिक दौऱ्यावर आहेत. यामध्ये परतीच्या पावसाने शेती पिकाचे नुकसान, लम्पि रोगाचा प्रादुर्भाव इत्यादीचा त्यांनी आढावा घेतला. अनेक ठिकाणी शेतात पाणी आहे. यासाठी मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे. संपूर्ण पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.