Himachal Pradesh Results 2022 : CM जयराम ठाकूर यांचा रेकॉर्ड, सातव्यांदा जिंकले

Himachal Pradesh Results 2022 : . हिमाचलमध्ये यावेळी 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले.
Himachal Pradesh Results 2022
Himachal Pradesh Results 2022 sarkarnama

सेराजमधून सीएम जयराम ठाकूर यांनी काँग्रेसचे चेतराम ठाकूर यांचा 20 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. तर मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर जागेवर भाजपचे राकेश जामवाल यांनी काँग्रेसचे सोहन लाल ठाकूर यांचा 8,125 मतांनी पराभव केला. सीएम ठाकूर यांच्या गृहजिल्ह्यात भाजप क्लीन स्वीपकडे वाटचाल करत आहे. भाजपने 10 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे, तर उर्वरित 5 जागांवरही भाजप आघाडीवर आहे.

सुंदरनगरमधून भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. राकेश कुमार हे विजयी झाले आहेत.

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंह यांचे चिंरजीव विक्रमादित्य सिंह हे आघाडीवर आहे. त्यांनी ७२३३ मतांनी आघाडी घेतली आहे. विक्रमादित्य हे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.

हिमाचल प्रदेशात कलांनुसार भाजप 33 जागांच्या आघाडीसह पहिल्या स्थानावर आहे. तर काँग्रेसला 33 जागांवर आघाडी, इतरांना 3 जागा

7 मंत्र्यांच्या मतदारसंघात अटीतटीची लढत
हिमाचल प्रदेशात प्रत्येक वेळी 45 ते 75 टक्के मंत्री निवडणुकीत पराभूत होण्याचा ट्रेंडही आहे. यावेळीही जयराम ठाकूर यांच्या 11 पैकी 7 मंत्र्यांच्या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तर दोन मंत्र्यांच्या जागाही बदलल्या आहेत. त्यामध्ये नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांना शिमला शहरी जागेच्या जागी कसुम्प्टी आणि कांगडा जिल्ह्यातील नूरपूर जागेच्या जागी वनमंत्री राकेश पठानिया यांना फतेहपूरमधून उमेदवारी देण्यात आली होती.

हिमाचल प्रदेशात प्रत्येक वेळी 45 ते 75 टक्के मंत्री निवडणुकीत पराभूत होण्याचा ट्रेंडही आहे. यावेळीही जयराम ठाकूर यांच्या 11 पैकी 7 मंत्र्यांच्या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तर दोन मंत्र्यांच्या जागाही बदलल्या आहेत. त्यामध्ये नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांना शिमला शहरी जागेच्या जागी कसुम्प्टी आणि कांगडा जिल्ह्यातील नूरपूर जागेच्या जागी वनमंत्री राकेश पठानिया यांना फतेहपूरमधून उमेदवारी देण्यात आली होती.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या गृहजिल्ह्यात भाजप चारपैकी दोन जागांवर तर काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या गृह जिल्ह्यात भाजप 10 पैकी 7 जागांवर आघाडीवर आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार 3 जागांवर आघाडीवर आहेत. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. हिमाचल भाजपचे अध्यक्ष सुरेश कश्यप राज्य पक्ष कार्यालयात पोहोचले.

11 पैकी 7 मंत्र्यांच्या मतदारसंघात अटीतटीची लढत
हिमाचल प्रदेशात प्रत्येक वेळी 45 ते 75 टक्के मंत्री निवडणुकीत पराभूत होण्याचा ट्रेंडही आहे. यावेळीही जयराम ठाकूर यांच्या 11 पैकी 7 मंत्र्यांच्या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तर दोन मंत्र्यांच्या जागाही बदलल्या आहेत. 

भाजप ३३, काँग्रेस ३३ जागांवर आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत

पहिल्या कलानुसार, काँग्रेस 16 तर भाजप 15 जागांवर आघाडीवर

हिमाचलप्रदेशमध्ये एक्झिट पोलमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. हिमाचलमध्ये यावेळी 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. राज्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 75.57 टक्के मतदान झाले होते. हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल 2022 साठी मतमोजणी आज कडेकोट बंदोबस्तात होत आहे.

हिमाचल प्रदेशात प्रत्येक पाच वर्षानंतर सत्ता बदल होते, अशी परंपरा आहे. भाजप आणि काँग्रेसने आलटून पालटून 5-5 वर्षे राज्यात सत्ता स्थापन केली आहे. या मुळेच भाजपने आपल्या प्रचारात ‘रिवाज बदलो’वर अधिक जोर दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com