Hindenburg report on Adani : हिंडेनबर्ग अहवालावरून आता काँग्रेस (Congress) पक्ष आक्रमक होणार आहे. काँग्रेसने येत्या 6 फेब्रुवारी रोजी आयुर्विमा महामंडळ कार्यालय (Lic) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) कार्यालयासमोर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या जवळच्या काही मित्रांच्या हितासाठी, त्यांना फायदा पोहचवण्यासाठी लोकांनी कष्टाने कमावलेला पैसा धोक्यात घालू शकत नाहीत."
ठएलआयसीने अदानी समूहात 36,475 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर भारतीय बँकांनी समूहात सुमारे 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. स्टॉक मॅनिप्युलेशन आणि फसवणूक व इतरही चुकीच्या कृत्यांचे अदानींवर आरोप होत असताना, चुकीच्या गोष्टी होत आहेत. हिंडेनबर्गने अहवाल जाहीर केल्यानंतर गेल्या सात ते आठ दिवसात अदानी समूहाला १०० अब्ज डॉलर्सचे इतका मोठा नुकसान झाले आहे," असेही ते म्हणाले.
"सर्व प्रदेश काँग्रेस समित्यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी जिल्हा काँग्रेस समित्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, जेणेकरून वरिष्ठ नेते, पक्ष अधिकारी आणि कार्यकर्ते, पंचायत आणि बूथ स्तरावर संपूर्ण आंदोलनाची माहिती सहज पोहचवता येईल. अदानी प्रकरणाची जेपीसी किंवा सरन्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणीही काँग्रेस करत आहे, कारण जनतेचा लाखो कोटींचा पैसा अदानी समूहाकडे गेला आहे," असेही म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "वाढणारी बेरोजगारी, प्रचंड महागाई आणि आर्थिक संकटामुळे देशात सर्वत्र उदासीनता असताना, मोदी सरकारने लोकांच्या या प्रश्नांच्या निराकरण करणारे अर्थसंकल्प सादर करणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. दुर्दैवाने लोकांच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी आणि लूट थांबवण्याऐवजी हे सरकार अजूनही पंतप्रधान मोदींच्या मित्रांना मदत करत आहे, असे वेणुगोपाल म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.