Gang Rape : एमआयएम आमदाराच्या मुलाला अटक, गुन्हा घडला ती सरकारी कार

ज्या इनोव्हा कारमध्ये हा गुन्हा घडला ती सरकारी कार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
hyderabad gangrape updates
hyderabad gangrape updatessarkarnama
Published on
Updated on

मुंबई : हैदराबाद बलात्कारप्रकरणी एमआयएम (AIMIM) आमदाराच्या मुलाला आणि पुतण्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही अल्पवयीन आहेत.याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.ज्या इनोव्हा कारमध्ये हा गुन्हा घडला ती सरकारी कार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

28 मे रोजी ही घटना घडली होती.AIMIM आमदाराच्या मुलावर सामूहिक बलात्कार करण्याऐवजी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या इनोव्हा कारमध्ये पीडितेवर बलात्कार झाला त्यामध्ये आमदाराचा मुलगा नव्हता. मात्र त्याने मर्सिडीजमध्ये पीडितेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

hyderabad gangrape updates
पंकजांना डच्चू दिल्यानंतर भुजबळाचं सूचक विधान ; खडसेंच्या बाबतीत तेच झालं होतं..

आमदाराच्या मुलाला सामूहिक बलात्कारासाठी ताब्यात घेण्यात आलेले नाही, तर भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या कलम 354 नुसार ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित पाच आरोपींवर कलम 376 (डी) (सामूहिक बलात्कार), 354, 366 (अपहरण), पॉक्सो कायदा, आयटी कायदा (पीडितेचे व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी) आणि इतर अनेक कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

हैदराबादच्या ज्युबली हिल्समधील एका निर्जन ठिकाणी ही घटना घडली होती. पीडित मुलगी एका पबमध्ये पार्टी करून घरी परतत होती. यादरम्यान,पबमधून बाहेर पडत असताना काही मुले तिच्याजवळ आली आणि तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेले.

हैदराबादच्या पॉश ज्युबली हिल्स भागात मुलांनी कार पार्क केली आणि मुलीवर बलात्कार केला. भाजप आमदार एम रघुनंदन राव यांनी पत्रकार परिषदेत काही छायाचित्रे दाखवली आणि आरोप केला की, AIMIM आमदाराचा मुलगाही या प्रकरणात सामील आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com