Hyderabad : आंध्र प्रदेश आता राजधानीविना; हैदराबादनंतर कोणत्या शहराला पसंती?

Andhra Pradesh Vs Telangana :आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यानुसार, 2 जून 2014 पासून हैदराबाद हे 10 वर्षांच्या कालावधीसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांची राजधानी असेल असे ठरवण्यात आले होते. आता या कराराची मुदत संपली आहे.
Hyderabad
HyderabadSarkarnama

Andhra Pradesh News : आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होऊन 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी आंध्र आणि तेलंगणा या राज्यांसाठी हैदराबाद ही संयुक्त राजधानी असेल, असे ठरवण्यात आले होते. आता 2 जून 2024 पासून मात्र हैदराबादवरील राजधानी म्हणून आंध्र प्रदेशला दावा सोडावा लगणार आहे. त्यानुसार आजपासून आंध्र प्रदेश राज्यास राजधानीच नसेल.

हैदराबाद, देशातील सर्वाधिक गजबजलेल्या शहरापैंकी एक असून ते आंध्र आणि तेलंगणाची संयुक्त राजधानी होते. यापुढे आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, 2014 नुसार, 2 जूनपासून हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी असेल. तर आंध्र प्रदेशास आता आपली नवी राजधानी शोधावी लागणार आहे.

आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या वेळी 2014 मध्ये, हैदराबादला 10 वर्षांसाठी तेलंगणा आणि हैदराबाद या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी बनवण्यात आली होती. तेलंगणा 2 जून 2014 रोजी अस्तित्वात आले होते. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यानुसार, 2 जून 2014 पासून हैदराबाद हे 10 वर्षांच्या कालावधीसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांची राजधानी असेल. यातील उपकलम (1) मध्ये नमूद केलेला कालावधी संपल्यानंतर, हैदराबाद ही तेलंगणा राज्याची राजधानी असेल आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी नवीन राजधानी शोधावी, असे नमूद केले आहे.

तेलंगणा राज्याच्या निर्मितीची मागणी अनेक दशकांपासून होत होती. फेब्रुवारी 2014 मध्ये संसदेत आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्यानंतर 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची स्थापना झाली. मुदत संपण्याची वेळ जवळ येऊ लागताच तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डींनी गेल्या महिन्यात हैदराबादमधील सरकारी गेस्ट हाऊस लेक व्ह्यू सारख्या इमारती ताब्यात घेण्यास सांगितले होते.

दरम्यान, विभाजन होऊन दहा वर्षे उलटूनही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यातील मालमत्तेचे विभाजन यासारखे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. आंध्र प्रदेशाला आपली राजधानी ठरवता आलेली नाही. आंध्राच्या राजधानीवरून आमरावती आणि विशाखापट्टनमचा वाद न्यायालयात सुरु आहे. यावर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले, पुन्हा मुख्यमंत्री झालो तर आमरावतील प्रशासकीय राजधानी, विशाखापट्टनममध्ये विधानसभा असेल तर कर्नूल ही ज्युडीशिअल राजधानी करण्यात येईल.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com