राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले, 'पळून जाणार नाही, मी आणि कुटुंब यु्क्रेनमध्येच'

Russia-Ukraine Wa|rvolodymyr zelenskyy| रशियन सैनिकांनी आता युक्रेनची राजधानी कीववरही हल्ला केला असून कीवचा काही भूभाग आणि विमानतळावर ताबा मिळवला आहे.
Russia-Ukraine War
 volodymyr zelenskyy
Russia-Ukraine War volodymyr zelenskyy
Published on
Updated on

नवी दिल्ली: गेल्या दोन दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्धाचा भडका उडाला आहे. रशियाने युक्रेनचा बराचसा भाग ताब्यात घेतला असून आता राजधानी कीव लाही वेढा घातला आहे. अशातच काल काही वृत्तसंस्थांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr zelenskyy) भुमिगत झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर वलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्वत चा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला असून आपण युक्रेनमध्येच असल्याची पुष्टी केली आहे. (volodymyr zelenskyy latest news

या व्हिडिओत झेलेन्स्की यांच्यासोबत त्यांचे सल्लागार आणि युक्रेनचे पंतप्रधान देखील सोबत दिसत आहेत. युक्रेनची राजधानी कीवमधील रस्त्यावरून त्यांनी हा व्हिडिओ जारी केला आहे. 'आम्ही युक्रेनमध्येच आहोत. आम्ही कीवमध्ये आहोत. आम्ही युक्रेनचे रक्षण करत आहोत." याआधी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ते म्हणाले, मी आणि माझे कुटुंब युक्रेनमध्ये आहे. ते देशद्रोही नाहीत ते युक्रेनचे नागरिक आहेत. मी (रशिया) आणि माझे कुटुंब शत्रूच्या टार्गेटवर आहे, असल्याची माहिती आम्हाला कळाली आहे.

युक्रेनला रशियन हल्ल्यापासून वाचवण्यासाठी ते सातत्याने इतर राष्ट्राचा सतत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनवरील संकटाच्या पार्श्वभुमीवर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशीही जवळपास अर्धा तास चर्चा केली. यावेळी वलोडिमिर झेलेन्स्की यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत निर्बंध आणि संरक्षण मदत यावर चर्चा केल्याचे म्हटले आहे.

Russia-Ukraine War
 volodymyr zelenskyy
आमच्याकडे अणुबॅाम्ब आहे, हस्तक्षेप करु नका ; रशियाची अमेरिकेला धमकी

यासोबतच, युक्रेन आणि रशिया चर्चेसाठी ठिकाण आणि वेळ यावर चर्चा करत आहेत. तर रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन रशियासोबत युद्धविराम आणि शांततेबद्दल चर्चा करण्यास तयार आहे. दूसरीकडे मात्र, रशिया मागे हटण्यास तयार नाही. रशियानं शुक्रवारीही युक्रेनच्या राजधानीवर हा हल्ला केला आहे. रशियाने केलेल्या या हल्ल्यात शंभरहून अधिक लोक मारले गेले आहेत.

दरम्यान, रशियन सैनिकांनी आता राजधानी कीव मध्येही घुसखोरी करत कीवचा काही भाग ताब्यात घेतला आहे. कीवच्या विमानतळावर रशियन सैनिकावर ताबा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र युक्रेनने अद्यापही माघार घेतली नसून आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याची भूमिका युक्रेनियन सैनिकांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com