UPSC टॉपर टीना दाबी होणार पुण्याच्या सुनबाई; २२ एप्रिलला लग्न

Tina Dabi | Pradeep Gawande : २०१६ च्या बॅचच्या UPSC टॉपर टीना दाबी
Pradeep Gawande Tina Dabi News, Pradeep Gawande News
Pradeep Gawande Tina Dabi News, Pradeep Gawande NewsSarkarnama
Published on
Updated on

जयपूर : UPSC टॉपर टीना दाबी आता पुण्याच्या सुनबाई होणार आहेत. २०१६ बॅचच्या टॉपर टीना दाबी आणि आयएएस अधिकारी डॉ. प्रदिप गावंडे २२ एप्रिल रोजी लग्न बांधणात अडकणार आहेत. टीना डाबी यांनी इन्स्टाग्रामवरुन “तू दिलेलं हास्य मी परिधान करत आहे” असे लिहून प्रदीप गावंडे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत यासंबंधी खुलासा केला आहे. दोघेही राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. (Pradeep Gawande Tina Dabi News)

डॉ. प्रदिप गावंडे हे २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या फेसबुकवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी झाला असून ते मुळचे पुण्याचे आहेत. त्यांनी UPSC परिक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. गावंडे यांनी यापूर्वी चुरु जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली असून सध्या ते राजस्थानच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे संचालक आहेत.

दरम्यान टीना दाबी आणि प्रदिप गावंडे या दोघांचाही हा दुसरा विवाह असणार आहे. यापूर्वी टीना यांनी २०१८ मध्ये २०१६ च्या युपीएससी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर आयएएस अतहर खान यांच्यासोबत लग्न केले होते. ट्रेनिंगदरम्यान टीना आणि अतहर यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र दोन वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये दोघांनीही सहमतीने तलाक घेतला होता. लग्नानंतर अतहर खान राजस्थानमध्ये कार्यरत होते. पण तलाक झाल्यानंतर त्यांनी जम्मू काश्मिर केडर निवडले आणि आपल्या राज्यात गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com