Mamata Banerjee on Loksabha : भाजपने डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणुका घेतल्या तर..; ममता बॅनर्जींचे सूचक विधान

Lok Sabha Elections 2024 : निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात जाऊ नका, असा इशाराही त्यांनी राज्यपाल सी.व्हि. आनंद यांच्यावर निशाणा साधला आहे
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama

Mamata Banerjee On Lok Sabha Elections : भारतीय जनता पक्षाने देशभरात आगामी लोकसभेची तयारी सुरू केली असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सूचक विधान केलं आहे. 'लोकसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्येच झाल्या तर आश्चर्य वाटायला नको,' असं सूचक विधान ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

ममता बॅनर्जींपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनीही मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Mamata Banerjee
Bachchu Kadu News : बच्चू कडूंनी आरोग्य अधिकाऱ्याला भरला दम ; आशा सेविकांना ऑनलाइन कामाची सक्ती केली तर झोडपून काढणार...

दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्यावरही मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी निशाणा साधला होता. राज्यपाल घटनात्मक नियमांचे उल्लंघन करत आहेत, असा दावा करत मी या पदाचा आदर करते, पण त्यांच्या असंवैधानिक कारवायांचे समर्थन करत नाही. अशी टीकाही त्यांनी केली होती.

धक्कादायक बाब म्हणजे, भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व हेलिकॉप्टर आधीच बुक केले आहेत. इतर राजकीय पक्षांनी प्रचारासाठी त्यांचा वापर करू नये म्हणून हे हेलिकॉप्टर बुक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Mamata Banerjee
Sharad Pawar Vs Ajit Pawar : बीडच्या सभेनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने; नेमकं काय झालं ?

तसेच, मधील सीपीआय(एम) ची सत्ता आम्ही संपवली. आता लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करू. भाजपने आपल्या देशात समाजिक कटुता निर्माण केली आहे. ते पुन्हा सत्तेत आले तर आपला देश द्वेषाचा देश बनवेल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोलकाता जवळील बेकायदेशीर फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, काही लोक काही पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर कामात गुंतले होते. पश्चिम बंगालमधील दत्तपुकुर येथे रविवारी एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

तसेच, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि जादवपूर विद्यापीठात ‘गोळी मारा’चा नारा देणाऱ्यांना, हे यूपी नाही, जाधवपूर विद्यापीठात ‘गोळी मारा’च्या घोषणा देणाऱ्यांना अटक केली जाईल, असा इशाराही बॅनर्जी यांनी दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com