Imran Khan : इम्रान खान यांना धक्का ; पाच वर्षांची निवडणूक बंदी!

Imran khan : पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान पाच वर्षे संसदेचे सदस्य होऊ शकणार नाहीत.
Imran Khan
Imran Khan Sarkarnama
Published on
Updated on

इस्लामाबाद : तोशा खाना प्रकरणात परदेशी नेत्यांकडून आलेल्या भेटवस्तूंची विक्री करून, मिळवलेली रक्कम लपवल्याबद्दल पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तब्बल पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले. या निर्णयानंतर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान पाच वर्षे संसदेचे सदस्य होऊ शकणार नाहीत. या निर्णयानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाल्याची घटनाही समोर आली आहे.

भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेली रक्कम उघड न केल्याबद्दल त्यांना अपात्र ठरवण्यासाठी सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगात 70 वर्षीय इम्रान खान यांच्याविरुद्ध खटला दाखल केला.

ईसीपीने 19 सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय खंडपीठाने शुक्रवारी एकमताने हा निर्णय दिला. इम्रान खान भ्रष्ट व्यवहारात गुंतले आहेत आणि त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवले आहे.

Imran Khan
पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही.

ईसीपीने असेही जाहीर केले की, त्यांच्यावर भ्रष्ट व्यवहार विरोधी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. आता या निर्णयाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे खान यांच्या पक्षाचे सरचिटणीस असद उमर यांनी सांगितले. खान यांचे समर्थकांनी या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करत आहेत.

काय आहे प्रकरण :

2018 मध्ये इम्रान खान जेव्हा सत्तेवर आले. श्रीमंत अरब शासकांच्या भेटींमध्ये खान यांना महागड्या भेटवस्तू मिळाल्या. ज्या त्यांच्या तोशाखान्यात जमा केल्या आहेत. नंतर त्याची सवलतीच्या दरात विक्री केली गेली. यातून भरघोस रक्कम मिळवण्यात आली. भेटवस्तूंमध्ये एक मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. खान यांच्या विरोधकांनी असा दावा केला होता की, आयकर रिटर्नमध्ये त्यांनी ही बाब लपवून ठेवली.

Imran Khan
Mehbooba Mufti यांना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश ; मेहबुबा मुक्ती न्यायालयात जाणार

खान यांना अपात्र ठरवण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद ६२ आणि ६३ अन्वये ईसीपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1974 मध्ये स्थापन झालेले, तोशाखाना हा मंत्रिमंडळ विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील एक विभाग आहे. यामध्ये राज्यकर्ते, संसद सदस्य, नोकरशहा आणि अधिकारी यांना इतर सरकारे आणि राष्ट्रप्रमुख आणि परदेशी मान्यवरांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com