Karnataka Election : कर्नाटकमध्ये काही दिवसांनी भाजप सरकार नसणार; शिवकुमारांचा घणाघात

Congress vs BJP : जाहीरनाम्यामुळे काँग्रेस-भाजपमधील वाद शिगेला
D. K. Shivakumar
D. K. ShivakumarSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेस-भाजप ऐकमकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झोडत आहेत. त्यातच पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भापचे झेंडे लावायला सांगितल्याचा आरोप होत आहे. भाजप सरकारकडून सध्या दडपशाही होत आहे. आता काही दिवसांनी राज्यात भाजपचे सरकार नसेल, असा घणाघात कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.

D. K. Shivakumar
Karnataka Election : मुख्यमंत्री शिंदेंची जादू कसब्यात 'फेल'; कर्नाटकात चालणार का?

येलाहांका येथील सभेत शिवकुमार (D. K. Shivakumar) बोलत होते. ते म्हणाले, "कर्नाटकचे (Karnataka) भाजप सरकार पोलीस आणि आयकर विभागातील अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणत गैरवापर करीत आहे. निवडणुकीत भाजपच्या आदेशावरून पोलीस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना छळत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर भाजपाचे झेंडा लावण्साठी दबाव आणला जात आहे. आता पोलिसांना एकच सांगतो की कर्नाटकमध्ये काही दिवासांनी भाजपचे सरकार नसेल."

D. K. Shivakumar
Sharad Pawar Book : ठाकरेंनी संघर्षाऐवजी माघार घेतल्यानं सरकार पडलं; पवारांनी पुस्तकात स्पष्टच सांगितलं

दरम्यान, आलानंद येथील सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. खर्गे म्हणाले, "पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणात की ना भ्रष्टाचार करणार ना करू देणार. मात्र मोदी यांचे सर्व साथीदार भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. त्याकडे मोदी सोयीस्कर दुर्लक्ष करतात. त्यांचा नियम फक्त दुसऱ्यांना लागू आहे. भाजपातील नेते सर्व कामांसाठी ४० टक्के कमिशन मागतात."

D. K. Shivakumar
PCMC News : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरी-चिंचवडला झुकते माप, मात्र निष्ठावंतांना डावलल्याने नाराजी !

'या' संघटनांवर बंदी घालणार

काँग्रेसने (Congress) आपल्या जाहीरनाम्यात पीएफआय, बजरंग दल संघटनांवर बंदी घालणार असल्याचे नमूद केले आहे. यावरून कर्नाटकमध्ये मोठा वाद सुरू झाला आहे. त्यानंतर मते बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दाराबाहेर काँग्रेसने मते मागायला आली तर कुत्रे अंगावर सोडू, असे फलक लावले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com