गोव्यात भाजपला धक्का : मुख्यमंत्री प्रमोद सावंत पहिल्या टप्प्यात ४३६ मतांनी पिछाडीवर!

भारतीय जनता पक्ष 19 जागांवर, तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे.
Pramod Sawant
Pramod SawantTwitter/@ANI
Published on
Updated on

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक निकालाच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढत असल्याचे दिसून येत आहे. निकालाच्या पहिल्या टप्प्यात गोव्यात भारतीय जनता पक्ष (bjp) 19 जागांवर, तर काँग्रेस (congress) 15 जागांवर आघाडीवर आहे. इतर 5 जागांवर आघाडीवर आहे. मात्र, मोठा गाजावाजा करत गोव्याच्या राजकारणात उतरलेली आम आदमी पार्टीला मात्र एकही जागावर आघाडी मिळालेली नाही. सांखळीमधून मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) मात्र ४३६ मतांनी पिछाडीवर पडले आहेत. या ठिकाणी धर्मेश सगलांनी आघाडीवर आहेत. (In Goa Chief Minister Pramod Sawant is trailing in the first phase)

गोव्याचे विधानसभेच्या (Goa Assembly Election) सर्व 40 ही जागांच्या मतमोजणी गुरुवारी सकाळी आठपासून सुरुवात झाली. त्यात पहिल्या टप्प्यात भारतीय जनता पक्ष 19 जागांवर, तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. इतर 5 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या पिछाडीवर आहेत. तसेच, पणजीतून बाबूशा मोन्सेरात आघाडीवर आहेत. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई फातोर्डा मतदारसंघातून 593 मतांनी आघाडीवर आहेत.

Pramod Sawant
UP Election Result : भाजप इतिहास घडवणार? सुरूवातीचे कल योगींच्या पारड्यात

पहिल्या टप्प्यात आघाडीवर असलेले उमेदवार...

ताळगाव : जेनिफर मोन्सेरात

पणजी: बाबूश मोन्सेरात

साळगाव : जयेश साळगावकर

साखळी: धर्मेश सगलानी

थिवी: नीळकंठ हळर्णकर

म्हापसा: ज्योशुआ डिसोझा

हळदोणा: ग्लेन टिकलो

सांतआंद्रे: वीरेश बोरकर

सांताक्रुझ: रुडॉल्फ

शिवोली: दयानंद मांद्रेकर

मये: प्रेमेंद्र शेट

पेडणे: राजन कोरगावकर

मांद्रे :जीत आरोलकर

डिचोली: चंद्रकांत शेट्ये

कुंभारजुवे :राजेश फळदेसाई

वाळपई: विश्वजीत राणे

पर्ये: दिव्या राणे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com