प्याँगयाँग : उत्तर कोरियात (North Korea) युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असताना कोरोना (Covid-19) आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासांत उत्तर कोरियात कोरोनाचे २ लाख ३२ हजार ८८० रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रोखण्यासाठी तीन हजार सैनिकांना आरोग्य सेवेच्या कामात समाविष्ट करण्यात आले. या सैनिकांमार्फत औषधांचा पुरवठा केला जात आहे. यात कोणताही अडथळा येऊ नाही, यासाठी कडक निर्देशही देण्यात आले आहेत. देशाच्या दुर्गम भागातही औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवावा, असे अध्यक्ष किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी सांगितले आहे.
कोरानामुळे देशभरात १४ लाख २८ हजार जणांना आपत्कालीन सेवेवर पाठविण्यात आले आहे. यात सरकारी अधिकारी, शिक्षक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय काही स्वयंसेवकांवरही हे काम सोपवण्यात आलं आहे. उत्तर कोरियात सुमारे १७ लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहेत. त्यापैकी 10 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्या आता १७ लाख १५ हजार ९५० असून त्यातील १० लाख २४ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. मागील 24 तासांत २ लाख ५ हजार ६३० रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोना परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी कमांड सिस्टिम विकसित करण्यात आली आहे. देशभरात कोरोनाविषयक घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अध्यक्ष किम जोंग उन यांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच लोकांना विलगीकरणात नेण्यासाठी अतिरिक्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशभरात सुमारे ५०० रॅपिड मोबाईल अँटी एपिडेमिक ग्रुप स्थापन करण्यात आले आहेत. हे ग्रुप कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
देशातील सुमारे ४० टक्के नागरिक कुपोषित आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला वैद्यकीय मदत जाहीर केली होती. यात मास्क, लशी, तपासणी किट देण्यात येणार होते. याला किम जोंग उन यांनी नकार दिला आहे. देशाची लोकसंख्या २.६ कोटी असून, देशातील आरोग्य सुविधा ही जगातील सर्वात खराब असल्याचे तज्ञांचे मत आहे. देशात रुग्णालये, स्पेशल केअर युनिट, औषधे, तपासणी किट याची टंचाई आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा न झाल्यास देशात सत्तांतरही होऊ शकते, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.