AAP Vs Congress : 'इंडिया'त वादाची पहिली ठिणगी ? दिल्लीतील लोकसभेच्या जागांवरून 'आप' काँग्रेसवर भडकली

INDIA And Delhi Lok Sabha Seat : जागावाटपाबाबत सर्व पक्षातील वरीष्ठ नेते निर्णय घेतील
Rahul gandhi, Arvind Kejariwal
Rahul gandhi, Arvind KejariwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्लीतील सर्व सात लोकसभेच्या जागांसाठी पक्षाने जोरदार तयारी करण्यास सांगिल्याचे काँग्रेस नेत्यांनी बुधावारी झालेल्या इंडियाच्या बैठकीत स्पष्ट केले. यामुळे आम आदमी पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी काँग्रेसला सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेसला दिल्लीत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल, तर इंडिया या आघाडीचा काय फायदा? असा प्रश्न आपने केला आहे. यामुळे इंडियात वादाची पहिली ठिणगी पडली की काय? असे चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत बुधवारी काँग्रेसच्या बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींच्या वक्तव्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. (Latest Political News)

दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागांवर निवडणुकीची तयारी सुरू केल्याचा दावा केल्यातंर आपच्या नेत्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे. "काँग्रेस नेत्याचे हे अतिशय धक्कादायक आहे. अशा वक्तव्यांनंतर 'इंडिया'च्या युतीमागील तर्क काय आहे? काँग्रेसने देशाच्या हितासाठी घेतले पाहिजे. आता पुढे काय करायचे ते अरविंद केजरीवाल यांनी ठरवावे", असे आपच्या नेत्यांनी प्रतिक्रया देत काँग्रसच्या भाषेचा निषेध केला आहे.

Rahul gandhi, Arvind Kejariwal
NCP Political News: निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा; 'या' साठी 8 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

काँग्रेसच्या बैठकीनंतर आपच्या नेत्या अलका लांबा म्हणाल्या, "दिल्लीपूर्वी १८ राज्यांच्या लोकसभा जागांच्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भात बैठक झाली. दिल्ली हे १९ वे राज्य होते. २०२४ च्या निवडणुका कशा जिंकायच्या यावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी सांगितले दिल्लीच्या सातही जागांवर लढण्याच्या तयारीचे आदेश आहेत. निवडणुकीला सात महिने राहिले असून सात जागा असल्याने आतापासून तयारीला लागले पाहिजे. दिल्लीत जो जिंकतो त्याचा देश, असा हेच इतिहास असून दिल्लीच्या सातही जागांवर ताकदीने लढायचे आहे."

"दिल्लीत काँग्रेस 'एकला चलो'ची भूमिका घेणार असेल तर 'इंडिया'चा काय उपयोग? अजून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळेच आम्ही दोन जागांवर लढू, चार जागांवर लढू किंवा बाकीच्यांवर काम करणार नाही, असे काही न बोलता काँग्रेसने थेट सात जागांचाच उल्लेख केला. काँग्रेसचे मत आम आदमी पक्षाकडे आले आहे. आमची लढत भाजपशी असून काँग्रेसला लढण्यासाठी आपच्या मतांची गरज आहे," अशा शब्दात लांबा यांनी काँग्रेसवर टीका केली.

Rahul gandhi, Arvind Kejariwal
Chandrashekhar Bawankule News : 'पवारसाहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला'; बावनकुळेंचा पलटवार

दरम्यान, आपच्या सौरभ भारद्वाज सामंजस्याची भूमिक घेत म्हणाले, "राजकारणात अशा गोष्टी होतच राहतील. इंडियातील सर्व पक्ष एकत्र बसून, जागावाटपावर चर्चा करतील, तेव्हा कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळतात हे कळेल. काँग्रेसच्या या निर्णयाने आमच्या आघाडीवर काहीही फरक पडणार नाही. दरम्यान, आपकडे राजकीय घडामोडीबाबत समिती आहे, ती चर्चा करून निर्णय घेईल."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com