
India in American Politics : अमेरिकेच्या राजकारणात भारतीयांचा दबदबा सातत्याने वाढत आहे आणि यावेळी एक नवा इतिहास रचला गेला. शनिवारी ४ जानेवारी रोजी सहा भारतीय वंशाच्या अमेरिकननी पहिल्यांदा अमेरिकी प्रतिनिधी सभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. या सहा नेत्यांनी अशाताच संयुक्त राज्य अमेरिकेचे प्रतिनिधी सभेसाठी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता.
हा मैलाचा दगड भारतीय-अमेरिकी समुदायासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. जो संयुक्त राज्य अमेरिकेत(America) या अल्पसंख्याक वांशिक समुदायासाठी आतापर्यंत सर्वात मोठी संख्या आहे. ते मिळून अनौपचारिक समोसा कॉकस तयार करतात.
समोसा कॉकसचा सर्वात आधी वापर राजा कृष्णमूर्ती यांनी केला होता. ज्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे आणि हा शब्द अमेरिकी संसदेत मूळ भारतीय सदस्यांच्या समूहाला संदर्भित करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा 2023मध्ये अमेरिकेची राजकीय यात्रा केली होती, त्यावेळी अमेरिकी संसदेला संबोधित करताना त्यांनीही समोसा कॉकसा उल्लेख केला होता.
कॉकसमध्ये आता सहा प्रतिनिधी सहभागी आहेत. अमेरिकेच्या संसदेत मागील निवडणुकीत मूळ भारतीय वंशाच्या पाच नेत्यांनी विजय मिळवला होता. परंतु यावेळी सहा नेत्यांनी विजय मिळवला. ज्यांची नावे आहेत, अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल, जेरमी कूनी आणि श्री थानेदार. सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, हे सर्व खासदार बायडेन यांच्या डेमोक्रेटिक पक्षाचे नेते आहेत.
समोसा कॉकसच्या सर्वात वरिष्ठ सदस्या अमी बेरा आहेत. ज्यांनी कॅलिफोर्नियाच्या सातव्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टच्या प्रतिनिधीच्या रूपात सलग सातवेळा विजय मिळवला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, जेव्हा मी 12 वर्षांपूर्वी पहिल्यांदा शपथ घेतली होती. तेव्हा मी काँग्रेसची एकमेव भारतीय-अमेरिकी सदस्य होते आणि अमेरिकी इतिहासातील तिसरी सदस्य होते. आता आमची आघाडी सहा सदस्यांची आहे. मी येणाऱ्या वर्षांमध्ये संसदेच्या सभागृहात आणखी जास्त भारतीय -अमेरिकींचे स्वागत करण्यासाठी उत्साही आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.