भारतीय विद्यार्थीनीचा युक्रेन सोडण्यास नकार; मी जगेल किंवा मरेल, पण...

नेहा ज्या घरामध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहात होती त्या घराचा मालक स्वेच्छेने युक्रेनच्या सैन्यात रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सामील झाला आहे.
भारतीय विद्यार्थीनीचा युक्रेन सोडण्यास नकार;  मी जगेल किंवा मरेल, पण...

कीव : रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ले करत भयंकर विध्वंस केल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोयोमीर झेलेन्स्की यांना कीवमधून बाहेर पडण्यास सांगितले. पण, त्यांनी साफ नकार दिला. "इथे लढाई सुरु आहे, मला शस्त्रांस्त्रे हवी आहेत. पळून जाण्यासाठी मदत नको." असे म्हणत अमेरिकेची ऑफर धुडकावून लावली. तसेच राजधानी कीवमधून एक नवीन व्हिडिओ जारी करत आपण शेवटच्या श्वासापर्यंत युक्रेनमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. (russia ukraine war)

युक्रेनमधील युद्धाच्या या परिस्थितीत भारतातील अठरा हजाराहून अधिक विद्यार्थी अडकले आहेत. युक्रेनमधून या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी विद्यार्थी भारताकडे मागणी करत आहेत. तर त्यांना सोडवण्यासाठी केंद्रसरकार हालचाली करताना दिसत आहेत. काही विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. मात्र युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अशी एक मुलगी आहे जिने युक्रेन सोडण्यास साफ नकार दिला आहे. (Indian student refuses to leave Ukraine)

भारतीय विद्यार्थीनीचा युक्रेन सोडण्यास नकार;  मी जगेल किंवा मरेल, पण...
पळण्यासाठी मदत नको, लढण्यासाठी शस्त्रास्त्रे द्या- झेलेन्स्कींनी धुडकावली अमेरिकेची ऑफर

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या हरियाणाच्या नेहा नावाच्या मुलीने युद्धग्रस्त देश सोडण्याची संधी मिळूनही तिने युक्रेन सोडण्यास नकार दिला आहे. नेहा हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या ती युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. नेहा ज्या घरामध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहात होती त्या घराचा मालक स्वेच्छेने युक्रेनच्या सैन्यात रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सामील झाला आहे. या घरमालकाची पत्नी आणि तीन मुली त्या घरात आहेत. घरमालकाच्या पत्नीची आणि त्याच्या तीन लहान मुलांची काळजी घेण्यासाठी आपण तिथेच राहणार असल्याचे नेहाने आपल्या कुटुंबियांना सांगितले आहे.

"मी जगेल किंवा नाही, पण मी या मुलांना आणि त्यांच्या आईला अशा परिस्थितीत सोडणार नाही," असे नेहाने तिच्या आईला सांगितले. नेहाने काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात असलेले वडील गमावले. गेल्या वर्षी तिने युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. एमबीबीएसची विद्यार्थिनी असलेल्या नेहाने युक्रेनची राजधानी कीव येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेली होती. पण कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायला जागा न मिळाल्याने तिने तेथील एका बांधकाम अभियंत्याच्या घरी एक खोली भाड्याने घेतली. युक्रेनमध्ये ती राहत असलेल्या घराच्या परिसरात रशियाने हल्ला केल्यानंतर नेहा, घरमालकाची पत्नी आणि तीन मुलांसह बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. अलीकडेच एका कौटुंबिक मित्राला सांगितले की, "आम्ही बाहेर स्फोट ऐकत राहतो, परंतु आतापर्यंत आम्ही ठीक आहोत."

भारतीय विद्यार्थीनीचा युक्रेन सोडण्यास नकार;  मी जगेल किंवा मरेल, पण...
russia ukraine war : जो बायडन यांनी सूचवले दोन पर्याय

कोपनहेगन मधील द ट्रिब्यूनशी बोलताना नेहाच्या नातेवाईक असलेल्या सविता जाखर यांनी सांगितले की, नेहाचे कुटुंबीय आणि ओळखीचे लोक तिला भारतात परत येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तिने तसे करण्यास स्पष्टपणे आणि ठामपणे नकार दिला आहे. सविता खापर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्येही नेहाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “पहाटेचे ४ वाजले आहेत, रात्रभर झोप न आल्याने मला अस्वस्थ वाटत आहे. एका जवळच्या मैत्रिणीची 17 वर्षांची मुलगी शिक्षणासाठी कीवमध्ये गेली होती. पण युद्धामुळे ती तिथे अडकली आहे. ती ज्या घरामध्ये राहत होती त्या घराचा मालक काही दिवसांपूर्वी सैन्यात दाखल झाला होता. आत्तापर्यंत, मुलगी घरमालकाची पत्नी आणि तीन मुलांसह एका बंकरमध्ये राहत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com