पळण्यासाठी मदत नको, लढण्यासाठी शस्त्रास्त्रे द्या- झेलेन्स्कींनी धुडकावली अमेरिकेची ऑफर

Russia-Ukraine War| America| शेवटच्या श्वासापर्यंत युक्रेनमध्येच राहणार असल्याचे वोल्डोयोमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
Volodymyr Zelensky
Volodymyr Zelensky
Published on
Updated on

कीव : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे (Russia-Ukraine War) सर्वात मोठे नुकसान युक्रेनमध्येच होताना दिसत आहे. युक्रेनचा नाश करूनच रशिया शांत होईल, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया सातत्याने हवाई हल्ले करत आहे. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केला असून एकामागून एक शहरांना वेढा घातला आहे. युक्रेनचे लोक बाहेर पडून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Russia-Ukraine War latest news update)

अशा परिस्थितीत अमेरिकेने युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी मदत करण्याची ऑफरही दिली होती. मात्र राष्ट्राध्यक्ष वोल्डोयोमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी स्पष्टपणे अमेरिकेची ही ऑफर नाकारली. आपल्याला पळून जाण्यासाठी पालखी नाही तर लढण्यासाठी शस्त्रे हवी आहेत. झेलेन्स्की यांनी राजधानी कीवमधून एक नवीन व्हिडिओ जारी करत आपण शेवटच्या श्वासापर्यंत युक्रेनमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे.

Volodymyr Zelensky
देशासाठी काहीही! रशियन टॅंक रोखण्यासाठी सैनिकाने पुलासह स्वत:लाही उडवले

रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ले करत भयंकर विध्वंस केल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोयोमीर झेलेन्स्की यांना कीवमधून बाहेर पडण्यास सांगितले. पण, त्यांनी साफ नकार दिला. असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, या संकटसमयी झेलेन्स्की यांनी कीवमधून बाहेर पडण्याची ऑफर नाकारली, "इथे लढाई सुरु आहे, मला शस्त्रांस्त्रे हवी आहेत. पळून जाण्यासाठी मदत नको."

रशिया-युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधात ठराव मांडण्यात आला. यावर सर्व देशांना मतदान करावे लागले. मात्र, भारताने या मतदानावर बहिष्कार घातला. सर्व सदस्य देशांनी मतभेद आणि वाद मिटवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करावेत, असे भारताने म्हटले आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या ठरावाच्या बाजूने 11 मते पडली. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने मतदानापासून स्वत:ला दूर राहिले. हा ठराव सुरक्षा परिषदेत संमत होऊ शकला नाही. या मतदानानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट करत, जग आमच्यासोबत आहे, सत्य आमच्यासोबत आहे, विजय आमचा आहे. असे म्हटले आहे.

तत्पूर्वी, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचा खरपूस समाचार घेत म्हटले की, "आम्ही एकटेच आमच्या देशाचे रक्षण करत आहोत. युक्रेनची राजधानी कीववर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर लोक देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. शेजारी देश." राजधानी कीववर क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान शुक्रवारी युक्रेनियन नागरिकांनी पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाकियामध्ये मोठ्या प्रमाणात स्थालांतर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com