युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल

रशिया-युक्रेनच्या युद्धाचा (Russia Ukraine War) आज पाचवा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी भारत सरकार कडे मदतीची मागणी केली आहे
Russia Ukraine War
Russia Ukraine WarSarkarnama

कीव : रशिया-युक्रेनच्या युद्धाचा (Russia Ukraine War) आज पाचवा दिवस आहे. या युद्धाच्या परिस्थिती भारत भारतात परत येण्यासाठी निघालेल्या काही विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेवर मारहाण करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भारतीय विद्यार्थ्याने (Indian Student) हा व्हिडीओ बनवला आहे. पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर काही सैनिक भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे विद्यार्थी मदतीसाठी गेले असताना त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याने आता पालकांचीही चिंता वाढली आहे.

आतापर्यंत भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये सुरक्षित असल्याचे बोलले जात होते. भारतीय ध्वज असलेली वाहने मार्गस्थ केली जात असल्याचे काही व्हिडीओही समोर आले होते. मात्र रविवारपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये युक्रेनच्या काही सीमेवर सैनिक भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याने आता पालकही चिंतेत पडले आहेत. लवकरात लवकर मुलांनी मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करत आहेत.

Russia Ukraine War
युक्रेनचा गनिमीकावा; रशियाला भटकवण्यासाठी उचललं मोठं पाऊल

सैनिक रस्त्यावर बसलेल्या विद्यार्थिनींसोबत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या किंचाळण्याचा आवाज स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. युद्धाचा आज पाचवा दिवस असून युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतासह इतर देशांतील विद्यार्थ्यांचा त्रास वाढतच चालला आहे. विद्यार्थी त्यांच्या देशाच्या दूतावासाकडे सतत त्यांच्या देशात परत जाण्याची मागणी करत आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुली आणि विद्यार्थ्यांना तेथून कोणत्याही मार्गाने बाहेर पडायचे आहे. मात्र त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक विद्यार्थी सीमेवर अडकले आहेत. सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे पण बॉम्बफेकीमुळे रशियन गोले त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये घबराट पसरली आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या मुलांना मारहाण होत आहे का, असा प्रश्न कुटुंबीयांच्या मनात येत आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. दरम्यान आतापर्यतं युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com