कोरोनानं पुन्हा हादरवलं; 'एक्सई'ची बाधा झालेला देशातील पहिला रुग्ण महाराष्ट्रात

मुंबईत पन्नास वर्षे वयाच्या एका दक्षिण आफ्रिकन महिलेच्या प्राथमिक तपासणीत एक्सई हा नवा व्हेरियंट आढळला आहे.
Covid 19
Covid 19Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात कोरोना (Covid 19) निर्बंध पूर्णपणे हटवल्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वेगाने संक्रमण होणाऱ्या 'एक्सई' (XE Variant) या कोरोनाच्या नवीन व्हेरिंएंटची बाधा झालेला देशातील पहिला रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आला आहे. याबाबत पुन्हा एकदा संबंधित रुग्णाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतरच यावर शिक्कामोर्तब केलं जाईल, असं राज्याच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पन्नास वर्षे वयाच्या एका दक्षिण आफ्रिकन महिलेच्या प्राथमिक तपासणीत एक्सई हा नवा व्हेरियंट आढळला आहे. ही महिला दक्षिण आफ्रिकेतून भारतात ता. १० फेब्रुवारी २०२२ रोजी आली होती. ता. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आलेल्या प्रयोगशाळा तपासणीत ही व्यक्ती कोविड बाधित आढळल्यानंतर तिचा नमुना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आला.

Covid 19
देशमुखांची दिल्लीवारी टळली; न्यायालयानं सीबीआयला बजावलं

या प्राथमिक तपासणीत तो एक्सई व्हेरीयंट असल्याचे आढळले. त्यानंतर GISAID च्या तपासणीत देखील सदर व्हेरियंट एक्सई असल्याचे आढळले असले तरी या नवीन व्हेरियंटची नि:संशय खात्री करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत या नमुन्याचे पुन्हा एकदा क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षणविरहित असून पुन्हा केलेल्या प्रयोगशाळा तपासणीत तो कोविड निगेटिव्ह आढळला आहे. एक्सई हा व्हेरीयंट बी ए. १ आणि बी ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो असे आतापर्यंतच्या माहिती वरून दिसते. विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असं आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Covid 19
राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडले अन् शरद पवारांनी दोनच वाक्यात दिलं उत्तर...

दरम्यान, राज्यात बुधवारी एकूण ८६५ ॲक्टिव्ह रुग्ण असून राज्यात १०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आज १०६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२६,०२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११ टक्के एवढे झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com