देशातील सर्वात उंच व्यक्तींची राजकारणात एन्ट्री ; उत्तरप्रदेशात 'सायकल'वर स्वार

समाजवादी पार्टीच्या धोरणांवर आणि नेतृत्वावर माझा विश्वास आहे, म्हणूनच मी सपामध्ये (SP) प्रवेश करीत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
Dharmendra Pratap Singh
Dharmendra Pratap Singhsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या रिंगणात आता देशातील सर्वात उंच व्यक्तींने एन्ट्री केली आहे. त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये (Samajwadi Party) प्रवेश केला आहे. समाजवादी पार्टीच्या धोरणांवर आणि नेतृत्वावर माझा विश्वास आहे, म्हणूनच मी सपामध्ये (SP) प्रवेश करीत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

धर्मेंद्र प्रताप सिंह (Dharmendra Pratap Singh) असं त्याचं नाव आहे. भारतातील सर्वात उंच व्यक्ती (Indias tallest Man) म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची उंची ८ फुट २ इंच इतकी आहे. त्यांच्या उंचीच्या विक्रमाची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. आशियातील सर्वात उंच व्यक्ती म्हणूनही त्यांच्या नावे रेकॉर्ड आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे

सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंह यांचे स्वागत केले आहे. सपाकडून त्यांच्या एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. अखिलेश यादव आणि सपाच्या कामावर धर्मंद्र प्रताप सिंह यांचा विश्वास आहे, त्यामुळे त्यांनी सपामध्ये प्रवेश केल्याचे सपाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. पण धर्मेंद्र प्रताप सिंह यांना सपा विधानसभेच्या रिंगणात उतरविणार कि नाही, याबाबत अजून निर्णय झालेला नाही.

धर्मेंद्र प्रताप सिंह यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. पण पदवीच्या आधारावर मात्र नोकरी मिळाली नसल्याचे सांगतात. ते प्रतापगडच्या नरहरपूर कासीयाही गावाचे रहिवासी आहेत. नोकरी नाही, म्हणूनच त्यांना अविवाहित राहावं लागले आहे. ''मी जेव्हा नोकरी मागतो तेव्हा लोकांना माझ्यावर विश्वास बसत नाही, अनेकांना माझे बोलणे गांभीर्याने घ्यावेसे वाटत नाही. अनेकदा माझ्या उंचीच्या माध्यमातूनच त्यांना पैसे कमवायचे असतात. अनेकदा उंचीमुळे मला पैसे मिळत असतील अशी लोकांची मानसिकता असते,'' असे त्यांनी माध्यमांना सांगितलं.

Dharmendra Pratap Singh
साठ टक्के आमदारांनी बदलला पक्ष ; 'आयाराम-गयाराम'चे नवं रेकॉर्ड केलं या राज्यानं

जास्त उंचीमुळेच त्यांना अनेकदा दैनंदिन कामे करण्यातही अडथळे येतात. त्यांना पाठदुखी आणि कंबरदुखीच्या त्रास आहे. त्यांना लखनौ येथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचाही सल्ला दिला आहे. नोकरी नाही, तसेच रोजगार नाही, म्हणूनच त्यांना योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागावी लागली. त्यानंतर २०१९ मध्ये हिप रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com