
Pakistan’s Appeal to the World Bank : पाकिस्तानची सध्या चारहीबाजूंनी कोंडी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने पाकिस्तानला धक्के बसत आहेत. भारतासोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सिंधू जल करारस स्थगिती प्रकरणी जागतिक बँकेकडे मदतीसाठी याचना केली होती मात्र जागतिक बँकेकडूनही पाकिस्तानला मोठ दणका बसला आहे. जागतिक बँकेने म्हटले की, संघटना सिंधू जल करारात केवळ एक मध्यस्थ आहे आणि ते काहीच करू शकत नाही.
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी म्हटले की, आमची भूमिका केवळ एका मध्यस्थीची आहे. मीडियात याप्रकरणी अनेक अंदाज वर्तवले जात आहेत, की जागतिक बँक कशाप्रकारे या समस्येवर तोडगा काढेन. परंतु या बोलण्याला काही अर्थ नाही, जागतिक बँक या प्रकरणात केवळ एक मध्यस्थ आहे.
भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानलाच मोठा दणका बसला आहे. कायदा आणि न्याय राज्यमंत्री अकील मलिक यांनी एका वृत्तसंस्थेस सांगितले होते की, पाकिस्तान कमीत कमी तीन वेगवेगळ्या कायदेशीर पर्यायांची योजना आखत आहे, ज्यामध्ये कराराची मध्यस्थ संस्था असणाऱ्या जागतिक बँकेसमोर हा मुद्दा मांडणे समाविष्ट आहे.
पंतप्रधान मोदींनी आधीच घोषणा केली आहे की, भारताच्या हक्काचे पाणी आता भारतासाठीच वापरले जाईल. त्यांनी म्हटले की, मीडियात पाण्याच्या मुद्य्यावर चर्चा सुरू आहे, भारताच्या हक्काचे पाणी भारताच्या वाट्यालाच वाहणार.
सिंधू करार स्थगित केल्यानंतर भारत आता पाकिस्तानला हे सांगण्यास बाध्य नाही, की तो हे पाणी कधी सोडेल आणि कधी बंद करेल. गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातून काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडे असल्याचे दिसून आले आहे. चिनाब नदीवर असलेल्या या धरणातून पाकिस्तानकडे वाहणारे पाणी भारताने आधी नियंत्रित केले होते आणि नंतर ते सोडले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.