मोदींच्या काळातच महागाईनेही केली ऐतिहासिक उच्चांकी कामगिरी

यंदा एप्रिलमध्ये घाऊक महागाईने १५.८ टक्क्यांचे शिखर गाठले.
PM Narendra Modi Latest Marathi News
PM Narendra Modi Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये भडकलेल्या युद्धामुळे (Russia-Ukraine war) देशात महागाईचा (Inflation) अक्षरशः वणवा पेटला आहे. यंदा एप्रिलमध्ये घाऊक महागाईने १५.८ टक्क्यांचे शिखर गाठले. घाऊक म्हणजेच ठोक बाजारातील या विक्रमी महागाईमुळे गहू, डाळी, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचे भाव आणखी कडाडणार आहेत. (Inflation Latest Marathi News )

मागच्या वर्षी एप्रिलमध्ये १०.७४ टक्क्यांवर असणाऱ्या घाऊक महागाई दराने (डब्ल्यूपीआय) यंदा त्याच काळात ९ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. २०१२-१३ नंतरची ही सर्वाधिक महागाई आहे. किरकोळ महागाई दरानेही २०१४ नंतरचा सर्वाधिक म्हणजे ७.८० टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. अंदमानमध्ये कालच दाखल झालेल्या मॉन्सूनने उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या भारतीयांना गुड न्यूज दिली असली तरी महागाईच्या झळा मात्र, अद्यापही शांत होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

PM Narendra Modi Latest Marathi News
भाजप पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या! आता रुपाली चाकणकर अॅक्शन मोडवर

सामान्यांना फटका

सलग तेराव्या महिन्यात महागाईचा चढा कल कायम राहिला आहे. तत्पूर्वी महागाई आटोक्याबाहेर जात असल्याचे दिसल्यावर रिझर्व्ह बॅंकेने मागच्या महिन्यात रेपो दरांत वाढ केली होती. घाऊक महागाई वाढण्याचा अपरिहार्य परिणाम हा किरकोळ बाजारपेठेतही किंमतवाढीचा भडका उडण्यामध्ये होतो. यामुळे सर्वसामान्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची महागाई आपला जबडा आणखी पसरणार हे सांगण्यास कोण्या तज्ज्ञाची आवश्यकता नाही. एप्रिलमध्येच किरकोळ बाजारातील महागाईने ९ वर्षांतील विक्रमी टप्पा गाठला आहे.

जागतिक बाजारात हे महाग

वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भडकलेल्या महागाईमागे, पेट्रोलियम (कच्चे तेल) व नैसर्गिक वायू, खनिज पदार्थ आदींच्या किमतींमध्ये जागतिक बाजारपेठेत झालेली प्रचंड वाढ हे कारण आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीत मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. या बिघाडाने जगभरातील जीवनावश्यक किमतीच्या समतोलावरही प्रतिकूल परिणाम होताना दिसतो.

भाज्या, गहू महागणार

दर महिन्याला वाढणाऱ्या महागाईमुळे पालेभाज्यांच्या किमतीत नजीकच्या काळात जबर वाढ होऊ शकते. एप्रिल महिन्यात भाज्यांचे दर २३.२४ टक्क्यांवर होते. तत्पूर्वी मार्चमध्ये हा दर १९.८८ टक्क्यांवर होता. गव्हाचे दर १४.०४ टक्क्यांवरून १०.७० टक्क्यांवर आले आहेत. याचा परिणाम ब्रेड व बिस्किटांचे आणखी दर वाढण्यात होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

PM Narendra Modi Latest Marathi News
आता हा 'गेम' राज ठाकरेंच्या हातात! भाजप खासदाराने योगींनाही पकडलं कोंडीत

आकडेवारीच बोलते...

वाढता आलेख (प्रमाण टक्क्यांत)

जानेवारी ....१२.९६

फेब्रुवारी....१३.११

मार्च......१४.५५

प्रमुख घटकांची भाववाढ

८.३५ टक्के

खाद्यपदार्थ

३८.६६ टक्के

पेट्रोलियम पदार्थ

१०.८५ टक्के

निर्मिती क्षेत्र

(कालावधी : एप्रिल 2022 )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com