Union Budget News : अर्थसंकल्पातून वगळून अल्पसंख्यांवर अन्याय; तटकरे, राऊत, कोल्हेंची टीका

NCP, Shivsena MP : शेतकऱ्यांच्या शेतमलाला बाजारभाव कसा देणार याचा उल्लेखच केला नाही
Sunil Tatkare, Amol Kolhe, Vinayak Raut
Sunil Tatkare, Amol Kolhe, Vinayak RautSarkarnama

Union Budget : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या दृष्टीने सात विविध प्राधान्यक्रम जाहीर करण्यात आले. यात बीसी, ओबीसी व इतर प्रवार्गाचा उल्लेख करण्यात आला. हे करताना मात्र देशात असलेले जैन, शिख, ख्रिश्चन आदी अल्पसंख्यांक वर्गांना वगळण्यात आलं. त्यामुळे अल्पसंख्याक वर्गावर अन्याय झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांनी केली आहे.

या अर्थसंकल्पाबाबत राष्ट्रवादीचे (NCP) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, "यावेळी अल्पसंख्याक असलेल्या वर्गाला कोणत्याही प्रकारची सवलत दिल्याचे पहायला मिळत नाही. अनेक गोष्टींची सवलत देत असताना त्याच-त्याच घोषणांची पुनरावृत्ती झाली. परिणामी पूर्वीच्या संबंधित योजनांचं आतापर्यंत काय फलीत झालं, तेच नेमकं या अर्थसंकल्पातून पहायला मिळत नाही. एकंदरीत निवडणुकांना समोर ठेवून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून पदरात काय पडेल असं काही वाटत नाही", अशी टीकाही तटकरे यांनी केली आहे.

Sunil Tatkare, Amol Kolhe, Vinayak Raut
Nitin Gadkari : शिक्षण आणि कृषी क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक मैलाचा दगड ठरणार !

या अर्थसंकल्पाबाबत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) थोडे सकारात्मक वाटत आहेत. मात्र त्यांनीही या अर्थसंकल्पावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोल्हे म्हणाले, "या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना मोठी सवलत मिळाली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या उद्योजकांनाही सवलत दिली गेली आहे. मात्र या सवलतीचा सूर काही ठराविक उद्योगपतींना समोर ठेवून दिली का काय, असा प्रश्न उपस्थित होतोय."

Sunil Tatkare, Amol Kolhe, Vinayak Raut
Budget 2023 News : कोणत्या मंत्रालयाला किती निधी? 'संरक्षण' पहिल्या क्रमांकावर, तर 'रेल्वे' तिसऱ्या स्थानी!

कोल्हे यांनी रेल्वेतील खासगी गुंतवणुकीबाबतही (Private investment in Railway) काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत कोल्हे म्हणाले, "अर्थसंकल्पात रेल्वेमध्ये खासगी गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र रेल्वेतील खासगी गुंतवणूक म्हणजे नेमंक काय, याचा तपशील दिलेला नाही."

पुढं बोलताना कोल्हे म्हणाले, "या अर्थसंकल्पात सर्वच गोष्टी वाईट आहेत, असं म्हणता येणार नाही. आता अनेक त्याच-त्याच घोषणांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र यापूर्वी केलेल्या घोषणांचा नेमकं काय झालं याचा लेखाजोखा दिला असता तर अर्थसंकल्पाबाबत सकारात्मकता येण्यास मदत झाली असती."

Sunil Tatkare, Amol Kolhe, Vinayak Raut
Budget Session 2023 : अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा; होणार थेट 'हा' फायदा

शिवसेनेचे (Shivsena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. राऊत म्हणाले की आता हे निवडणुकीचं वर्ष आहे. त्या पार्श्वभूमिवर जनतेना काही तरी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जनतेच्या पदरी विशेषतः मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा पडल्याचा उल्लेख राऊत यांनी यावेळी केला.

Sunil Tatkare, Amol Kolhe, Vinayak Raut
Union Budget 2023 : अर्थसंकल्पात पॅन कार्ड संदर्भात मोठी घोषणा; अर्थमंत्री म्हणाल्या...

विनायक राऊत म्हणाले, "अलिकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं मुंबईत सारखं येणं-जाणं वाढलं आहे. त्यामुळं मुंबईसाठी काहीतरी मोठं पॅकेज मिळेल, अशी आशा होती. मात्र तसं न होता मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या केंद्रीय अर्थसंकल्पातून झालं आहे."

यानंतर राऊत यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं जाहीर केलं आहे. मात्र शेतकऱ्यांने काढलेल्या उत्पादनाला योग्य बाजारभाव कसा मिळेल, याचा कोठेही उल्लेख केला नसल्याचीही माहिती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com