
https://sarkarnama.esakal.com/desh/mp-high-court-judge-duppala-venkata-ramana-serious-allegations-against-judiciary-supreme-court-concerns-indian-judicial-system-news-msr87ISI Terror Plot Foiled in India : पहलगाम हल्ल्याआधीच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIने भारतात मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. मात्र भारताच्या केंद्रीय यंत्रणांनी दिल्लीत पाकिस्तानातून चालणाऱ्या आयएसआयच्या स्लीपर सेल नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. जे आता समोर आले आहे. जवळपास तीन महिन्यांपेक्षाही अधिक काळ चालेल्या या कारवाईनंतर यंत्रणांनी दिल्लीतून नेपाळी वंशाच्या आयएसआय एजंटला पकडले, ज्याने एक मोठा खुलासा केला. खरंतर आयएसआयने दिल्लीत स्लीपर सेलचे जाळेच पसरवले होते.
प्राप्त माहितीनुसार, या ऑपरेशनची सुरुवात जानेवारीत एका अस्पष्ट माहितीच्या आधारावर झाली होती. जेव्हा अशी माहिती मिळाली होती की, आयएसआयचा एक एजंट संवेदनशील दस्तावेज, फोटो, गुगल कोऑर्डिनेट्स गोळा करण्यासाठी नेपाळमार्गे दिल्लीत पोहचणार आहे. यानंतर माहिती माहिती मिळाली की, दिल्लीत हल्ल्याची योजना आखली जात होती आणि याच्या प्लॅनिंगसाठी सुरक्षा दलाबाबतच्या गोपनीय माहितीचा वापर केला जात होता. खरंतर, तथापि या प्रकरणी उच्च दबाव असूनही अधिकाऱ्यांना पुढे जाण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वाट बघावी लागली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ISI एजंट दिल्लीत दाखल झाला होता आणि तो सुरक्षा दलांशी संबंधित गोपीनीय माहिती गोळा करत होता. याच दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी एक ट्रॅप सेट केला गेला आणि अन्सारीला संवेदनशील कागदपत्रांसह दिल्लीत त्यावेळी पकडले गेले, जेव्हा तो नेपाळमार्गे पाकिस्तानात परतण्याच्या मार्गावर होता.
सूत्रांनी सांगितले की, या पार्श्वभूमीवर दिल्ली-एनसीआरमध्येही दहशतवादी हल्ल्याचा कोणताही कट उधळण्यासाठी सक्रीय पावलं उचलली गेली. सूत्रांना अधिक सक्रीय केलं गेलं, ज्यानंतर संशयिताच्या प्रवास आणि कटाबाबत माहिती मिळाली. यानंतर अन्सारीला पोलिसांच्या स्वाधीन केलं गेलं आणि त्याच्यावर भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप लावण्यात आला. यानुसारच त्याच्याविरोधात एफआयआरही दाखल केला गेला.
अन्सारीला आयएसआयने भारतीय आर्मीशी निगडीत गोपनीय कागदपत्रांची सीडी बनवून पाकिस्तानला पाठवण्यास सांगितले होते. अन्सारीची चौकशी केल्यानंतर यंत्रणानंतर आझमलाही अटक केली गेली होती. जानेवारी ते मार्च २०२५ पर्यंत असे तीन महिने केंद्रीय यंत्रणांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ऑपरेशन्स राबवले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.