Karnataka Congress News: सिद्धरामय्यांनीच आम्हाला काँग्रेस सोडायला भाग पाडले; माजी मंत्री सुधाकर, सोमशेखर यांचा गौप्यस्फोट

Karnataka Election News: धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस युतीचे सरकार पाडण्यामागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचाच हात होता.
Siddaramaiah-Sudhakar-Somshekhar
Siddaramaiah-Sudhakar-SomshekharSarkarnama

बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस युतीचे सरकार पाडण्यामागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचाच हात होता. त्यांनीच आम्हाला काँग्रेस पक्ष सोडायला प्रवृत्त केले होते, असा आरोप माजी मंत्री एस. टी. सोमशेखर आणि डॉ. के. सुधाकर यांनी केला आहे. (It was Siddaramaiah who forced us to quit Congress: Ex-ministers Sudhakar, Somshekhar exploding)

डॉ. के सुधाकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सिद्धरामय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर एक दिवसही जनता दल (JDS) आणि काँग्रेस (Congress) युतीचे सरकार राहू देणार नाही, असे सिध्दरामय्या यांनी आमदारांना स्पष्टपणे सांगितले होते. सिद्धरामय्या दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडकडे जोरदार प्रयत्न करत असतानाच काँग्रेसचे दोन माजी मंत्र्यांनी आरोपाचा ट्विटरबॉम्ब टाकला आहे. मुख्यमंत्री होण्यापासून सिद्धरामय्या यांना रोखण्यासाठी ही खेळी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Siddaramaiah-Sudhakar-Somshekhar
Supreme Court : पुन्हा भिर्रर सुरु..; न्यायालयाच्या निकालावर खासदार कोल्हे म्हणाले..

काँग्रेस आणि धजद आघाडी सरकारच्या काळात सिद्धरामय्या हे समन्वय समितीचे अध्यक्ष हेाते. पण त्यांनीच आम्हाला पक्ष सोडण्यापासून परावृत्त केले आहे. सिद्धरामय्या यांचीच पक्ष सोडण्यामागे प्रेरणा होती. हे कोणीही नाकारू शकत नाही, असे सोमशेखर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

डॉ. सुधाकर हे नुकतेच झालेल्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांनीही सिद्धरामय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस-धजद आघाडी सरकारच्या काळात आमच्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार करण्यासाठी आम्ही समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांच्याकडे गेलेा होतो. त्यावेळी ‘माझ्या मतदारसंघातीलच कामे हेात नाही. या सरकारकडून काहीही घडणार नाही’ असे त्यांनी सांगितले होते.

Siddaramaiah-Sudhakar-Somshekhar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा पक्षप्रमुख ? ; कायदेशीर,तांत्रिक त्रुटी राहू नयेत म्हणून..

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपर्यंत सहन करा. लोकसभा निवडणुकीनंतर एक दिवसही कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात राहू देणार नाही, असे सिद्धरामय्या यांनी आम्हाला सांगितले होते, असेही सुधाकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

एवढे दिवस गप्प का?

सिद्धरामय्या यांनीच आम्हाला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले होते, यावर सुधाकर आणि सोमेश्वर हे आजपर्यंत गप्प का होते. त्यांना आत्ताच कशी जाग आली आहे. सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न सुधाकर आणि सोमशेखर हे दोघे करत आहेत, असा आरोप एम. टी. बी नागराज यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com