Jagdeep Dhankar on CJI Chandrachud: जगदीप धनखड यांनी केलं सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं कौतुक; म्हणाले, देशाची न्यायव्यवस्था...

काही दिवसांपुर्वीच उपराष्ट्रपती धनखड यांनी सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.
Jagdeep Dhankar on CJI Chandrachud:
Jagdeep Dhankar on CJI Chandrachud:Sarkarnama

Jagdeep Dhankar on CJI Chandrachud भारतातील न्यायालये सामान्य माणसाच्या समस्यांबाबत अत्यंत संवेदनशील आहेत आणि हे सर्व एका कुशल व्यक्तीच्या हातात आहे, अशा शब्दातं उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankar) यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे कौतुक केले. भारताचे सरन्यायाधीश म्हणून डी.वाय. चंद्रचूड यांच्याकडे जो अनुभव, वचनबद्धता, ध्येय आणि प्रतिभा आहे. अशी न्यायव्यवस्था भारताशिवाय दुसरीकडे कुठे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Jagdeep Dhankhar praised CJI Chandrachud; Said, the country's judicial system)

उपराष्ट्रपती जगदीप धनखर हे ब्रिटेनचे राजा किंग चार्ल्स तिसरा यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला गेले होते. यानंतर लंडनमधील भारतीय डायस्पोरा सदस्यांना संबोधित करत करताना त्यांनी हे उद्गार काढले आहेत. दरम्यान काही दिवसांपुर्वीच उपराष्ट्रपती धनखड यांनी सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये केलेल्या NJAC कायदा रद्द केल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाष्य केले होते. संसदेने केलेला कायदा अन्य कोणत्याही संस्थेने अवैध ठरवणे लोकशाहीसाठी चांगले नाही, अशी टिप्पण्णी त्यांनी केली होती.

Jagdeep Dhankar on CJI Chandrachud:
Karnataka Elections 2023: कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार; या मुद्द्यांवरुन उडाला प्रचाराचा धुराळा

त्यानंतर त्यांनी थेट चंद्रचूड (CJI Dhananjay Chandrachud) यांचं कौतुक केल्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सीजेआय चंद्रचूड यांचे कौतुक करताना धनखड म्हणाले की, चंद्रचूड यांच्या एका आदेशाने सामान्य माणसालाही दिलासा मिळतो. भारतात आता आमच्याकडे एक व्यवस्था आहे की तुम्ही कोणीही असलात तरी तुम्ही कायद्याला उत्तरदायी आहात. कायद्यापेक्षा इथे कुणीही मोठे नाही. इथे कुणीही कुणाशी गैरवर्तन करु शकत नाही. कारण आमच्याकडे एक मजबूत न्यायव्यवस्था आहे आणि या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व या पदासाठी पूर्णपणे पात्र असलेल्या व्यक्तीच्या हातात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com