Mehbooba Mufti: निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; सांगितलं कारण...

JK Assembly Elections Mehbooba Mufti Not to Contest:काँग्रेससोबत 2002 मध्ये युती केली तेव्हा आमचा एक अजेंडा होता. आम्ही सय्यद अली गिलानीला तुरुंगातून सोडले. आज ते करण्याचा विचार करू शकत नाही.
Mehbooba Mufti
Mehbooba MuftiSarkarnama
Published on
Updated on

पीडीपी पक्षप्रमुख आणि जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुक लढणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. निवडणुक जिंकल्यानंतर मी मुख्यमंत्री झाली तरीही केंद्र शासित प्रदेशात माझ्या पक्षाचा अजेंडा पूर्ण करु शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

मी भाजपसोबत असताना (2016)मुख्यमंत्री होते, तेव्हा 12 हजार व्यक्तींच्या विरोधातील गुन्हे मी रद्द केले, आता ते मी करु शकणार नाही. मोदी सरकारसोबत असताना फुटीरवाद्यांशी चर्चा करण्यासाठी पत्र लिहिलं होते. तसेच पत्र आज मी लिहू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

जम्मू आणि काश्मीर निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यातील युतीबाबत त्या म्हणाल्या की आम्ही दोन्ही पक्ष नेहमीच केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहोत. "आम्ही 2002 मध्ये काँग्रेससोबत युती केली तेव्हा आमचा एक अजेंडा होता. आम्ही सय्यद अली गिलानीला तुरुंगातून सोडले. आज ते करण्याचा विचार करू शकत नाही,

आम्ही 2014 मध्ये भाजप सरकारसोबत युती केली तेव्हा आमचा अजेंडा होता. कलम ३७० ला हात लावला जाणार नाही, AFSPA रद्द करणे, पाकिस्तान आणि हुर्रियतशी चर्चा करणे, वीज प्रकल्प परत करणे इ. आमच्याकडे एक अजेंडा होता, असे त्यांनी सांगितले. आम्ही नेहमीच लोकांच्या पाठिंब्यावर आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणुका स्वतंत्रपणे लढलो आहोत," असेही त्या म्हणाल्या.

Mehbooba Mufti
Beed News: जनसन्मान यात्रा येण्यापूर्वीच झळकले काळ्या रंगाचे बॅनर; बीडकरांनी विचारला अजितदादांना जाब

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने 17 जागांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच मेहबुबा यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. मेहबुबा या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत अनंतनागमधून रिंगणात होत्या, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट होती. सात जिल्ह्यांतील 24 विधानसभा मतदारसंघात 279 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com