Deepa Jayakumar
Deepa JayakumarSarkarnama

अण्णाद्रमुकसह शशिकलांना मोठा धक्का! जयललितांच्या मृत्यूनंतर भाची बनली वारसदार

अखेर जयललितांच्या मृत्यूनंतर त्यांची भाची दीपा जयकुमार यांचे चेन्नईतील पोएस गार्डन निवासस्थानात पाऊल पडले आहे.
Published on

नवी दिल्ली : तामिळनाडू्च्या माजी मुख्यमंत्री जयललिता (Jayalalithaa) यांच्या निवासस्थानाचे स्मृतिस्थळात रुपांतर करण्याच्या निर्णय उच्च न्यायालयाने (High Court) रद्द केला होता. यानंतर अखेर जयललितांच्या मृत्यूनंतर त्यांची भाची दीपा जयकुमार यांचे चेन्नईतील पोएस गार्डन निवासस्थानात पाऊल पडले आहे. यामुळे अण्णाद्रमुकसह (AIADMK) जयललितांच्या निकटवर्ती व्ही.के. शशिकला (V.K.Sasikala) यांना मोठा धक्का बसला आहे.

पोएस गार्डन निवासस्थानात तब्बल तीन दशके जयललिता यांचे वास्तव्य होते. या निवासस्थानात कार्यालय, वाचनालय, प्रतिक्षागृह आणि सभागृहाचा समावेश आहे. जयललिता यांच्या आईने १९६० मध्ये ते खरेदी केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक सरकारने (AIADMK) २०१७ मध्ये जयललिता यांच्या स्मरणार्थ या निवासस्थानाचे स्मृतिस्थळात रूपांतर करण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने २२ जुलै २०२० रोजी जयललिता यांच्या निवासस्थानाचे स्मृतिस्थळात रूपांतर करण्याचा आदेश काढला होता.

Deepa Jayakumar
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश देताच राज्यपाल भडकले अन् म्हणाले...

याला जयललितांची भाची दीपा जयकुमार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने या निवासस्थानाला स्मृतिस्थळ बनवण्याचा आदेश रद्द केला. हे निवासस्थान जयललितांच्या कायदेशीर वारसांच्या ताब्यात देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. अखेर चेन्नई जिल्हा प्रशासनाने दीपा यांच्याकडे या निवासस्थानाच्या चाव्या सोपवल्या. त्यानंतर त्यांचे पाऊल पोएस गार्डन निवासस्थानात पडले आहे.

Deepa Jayakumar
आले अंगावर तर घ्या शिंगावर! ममतांचे आता थेट केंद्र सरकारलाच आव्हान

निवासस्थानात पाऊल टाकताच दीपा आणि त्यांचे पती माधवन यांनी जयललितांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझ्या आत्याच्या अनुपस्थित मी पहिल्यांदाच निवासस्थानात येत आहे. आता हे घर खूप रिकामे आणि मोकळेमोकळे वाटत आहे. माझी आत्या वापरत असलेले फर्निचरही काढून टाकण्यात आले आहे. आता मी याच निवासस्थानात राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com