Hemant Soren सरकार पास ; विश्वासदर्शक ठराव जिंकला : सोरेन म्हणाले,"मी, घाबरणारा नाही,"

Hemant Soren : अटकेत असलेले काँग्रेसचे तीन आमदार विधानसभेत येऊ शकले नाहीत.
Hemant Soren
Hemant Sorensarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : झारखंडमध्ये मोठ्या राजकीय संघर्षानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. भाजपने सभात्याग केला. विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यानंतर विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. झारखंडच्या 81 सदस्यीय विधानसभेत सोरेन सरकारच्या बाजूने 48 मते पडली

पैशांच्या अफरातफरप्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे तीन आमदार विधानसभेत येऊ शकले नाहीत. भाजपचे २६, अन्य ४ आमदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. छत्तीसगडहून परतलेल्या सर्व आमदारांना सोरेन यांनीच सोमवारी सकाळी बसने विधानसभेत आणले होते. यावेळी भाजप आमदारांनी विधानसभेसमोर निदर्शने केली. सोरेन यांच्या आमदारांचे छत्तीसगडला जाणे आणि दुमका हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित गोंधळ घातला. भाजप आमदार सीपी सिंह यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या वागणुकीवर आक्षेप घेतला.

"विरोधकांनी हा प्रस्ताव पूर्णपणे ऐकून घ्यावा. मैदान सोडू नये. मी आंदोलकाचा मुलगा आहे. मी कोणालाही घाबरणार नाही," असे सोरेन म्हणाले. विश्वासदर्शक ठरावानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन पुन्हा एकदा सर्व आमदारांसह बसमध्ये बसून सर्किट हाऊसकडे रवाना झाले. ज्या पद्धतीने सरकारचे मंत्री दोन बसमधून विधानसभेत आले होते, त्याच पद्धतीने ते बसमध्ये चढून परत गेले आहेत.

सोरेन यांनी आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वी सोरेन आपल्या आमदारासोबत विधानसभेत पोहचले, त्यानंतर मतदान झाले.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते बाबूलाल मरांडी म्हणाले, " विश्वासदर्शक ठरावासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवणे योग्य नाही, पक्षाच्या स्वार्थांसाठी सोरेन यांनी हे केले आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करणार आहोत,"

Hemant Soren
Cyrus Mistry यांच्या अपघाती मृत्यूनंतर महिंद्रा यांनी टि्वट करुन केली ही विनंती

"लोकशाही वाचवणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. भाजप देशातील निम्म्या राज्यांमध्ये गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण करत आहे. कपडे, भाजीपाला, रेशन खरेदी केल्याचे ऐकले होते, भाजप आमदार खरेदी करत आहेत," असे सोरेन म्हणाले.

"गेल्या दिवसांपासून मुख्यमंत्री ज्या प्रकारे आमदारांसोबत फिरत आहेत. त्यांचा आपल्याच आमदारांवर विश्वास नसल्याचे यावरून दिसते. सरकार हे मुस्लिम तुष्टीकरणात गुंतले आहे. राज्यातील मुलींवर अत्याचार होत आहेत. पण सरकारला त्याची पर्वा नाही," असा आरोप भाजप आमदार नीलकंठ सिंह मुंडा यांनी सभागृहात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com