भाजप नेत्याची आमदारकी धोक्यात! जात प्रमाणपत्र अवैध ठरताच सरकारनं उचललं पाऊल

राज्य सरकार आणि भाजप असा वाद पेटला असून, या वादात आता राज्यपालांना ओढले आहे.
Samari Lal
Samari Lal Sarkarnama
Published on
Updated on

रांची : राज्य सरकार आणि भाजप (BJP) असा वाद पेटला आहे. या वादात आता सरकारने राज्यपालांना ओढले आहे. भाजपच्या आमदाराचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने गदारोळ उडाला आहे. या आमदाराला अपात्र ठरवण्यासाठी सरकारने राज्यपालांचा (Governor) दरवाजा ठोठावला आहे. यामुळे राज्यपालांची कोंडी झाली असून, या आमदाराला अपात्र ठरवण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढू लागला आहे.

झारखंडमध्ये (Jharkhand) भाजपचे आमदार समरी लाल यांच्याबाबत हा वाद सुरू आहे. लाल हे कांके या राखीव मतदारसंघातून 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले आहेत. याच महिन्याच्या सुरवातीला त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. यामुळे लाल यांना अपात्र ठरवण्याची मागणी सरकारने लावून धरली आहे. या मागणीसाठी सरकारने राज्यपालांकडे धाव घेतली आहे. कामगार मंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते सत्यानंद भोकटा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर, झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रवक्त्यांसह इतर नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.

Samari Lal
मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारताच काँग्रेसनं टाकणार मोठा डाव!

या शिष्टमंडळाने लाल यांचे जात प्रमाणपत्र राज्यपालांसमोर सादर केले. राजस्थानमधून झारखंडमध्ये स्थलांतरित झाल्यानंतरचे हे लाल यांचे प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र आता रद्द करण्यात आले आहे. शिष्टमंडळाने म्हटले आहे की, समारी लाल हे राजस्थानचे रहिवासी आहे. त्यामुळे झारखंडमधून जात प्रमाणपत्र मिळवण्यास ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळे ते झारखंड विधानसभेतूनही अपात्र ठरतात. त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करुन कांके विधानसभा मतदारसंघ रिक्त जाहीर करावा.

Samari Lal
भाजप नेत्याचं औदार्य! मुख्यमंत्र्यांसाठी सोडलं आमदारकीवर पाणी

झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा (JMM), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) आघाडीच्या सरकारने भाजपची आधीपासूनच कोंडी केली आहे. माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी भाजपने विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. यावर अध्यक्षांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात या मुद्द्यावर आक्रमक भूमिका भाजपने घेतली होती. यानंतर बाबूलाल मरांडी यांना विरोधी पक्षनेता बनवावे, अशी मागणी भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे केली होती. सरकार स्थापन होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप विरोधी पक्षनेता नेमण्यात आलेला नाही, हा मुद्दा भाजपने उपस्थित केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com