Jharkhand Political News : झारखंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; 'जेएमएम' अन् 'काँग्रेस' आमदारांना हैदराबादला केलं रवाना!

JMM and Congress MLAs left for Hyderabad : जेएमएमचे काही आमदार नॉटरिचेबल असल्याचीही माहिती समोर आली आहे.
JMM and Congress MLAs left for Hyderabad
JMM and Congress MLAs left for HyderabadSarkarnama
Published on
Updated on

Hemant Soren arrested by ED : झारखंडमध्ये मुख्यंत्री हेमंत सोरेन यांना EDकडून अटक झाल्यानंतर, तेथील सरकार संकटात आल्याचे दिसत आहे. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याबरोबरच चंपई सोरेने यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा केली होती. याशिवाय 47 आमदारांसह राज्यपालांना समर्थन पत्रही सोपवलं आहे. मात्र अद्यापर्यंत राज्यपालांकडून सरकार बनवण्यासाठी कुणालाही बोलावलं गेलं नाही.

या पार्श्वभूमीवर अशी शंका येत आहे की, झारखंडमध्ये 'खेला' होऊ शकतो. आमदार दुसऱ्या गटात जाण्याची शक्यता पाहता, जेएमएम आणि काँग्रेस आमदारांना अगोदर सर्किट हाऊसमध्ये थांबवण्यात आले होते. मात्र आता अशी अपडेट समोर आली आहे की, या सर्व आमदारांना स्पेशल विमानाने हैदराबादला पाठवलं जात आहे. (JMM and Congress MLAs left for Hyderabad)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

JMM and Congress MLAs left for Hyderabad
Champai Soren News : बिहारमध्ये सात तासांतच शपथविधी; झारखंडमध्ये 20 तास उलटूनही मिळेना मुख्यमंत्री...

हेमंत सोरेन(Hemant Soren) यांना EDने प्रदीर्घ चौकशीनंतर बुधवारी अटक केली होती. त्या अगोदर दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी छापेमारी झाली होती आणि तेव्हापासून झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. अटक होण्याअगोदर सोरेन यांनी व्हिडिओद्वारे समर्थक आणि राज्यातील जनतेला उद्देशून एक संदेश जारी केला होता. ज्यामध्ये त्यांनी नागरिकांना विश्वास कायम राखण्याचे आवाहन केले होते. मी निरपराध आहे परंतु तपास यंत्रणा चुकीच्या हेतूने काम करत आहे. भाजपने राज्यात आपली सक्रियात वाढवली आहे.

झारखंडमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जेएमएम आणि काँग्रेस आमदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांना हैदराबादला हलवण्याची तयारी खूप अगोदरच सुरू झाली होती. प्राप्त माहितीनुसार सर्वात अगोदर सर्व आमदारांना सर्किट हाऊसमध्ये बोलावलं गेलं. तर दुसरीकडे अशी मोठी अपडेट समोर आली आहे की, एक मोठी बस आतमध्ये नेण्यात आली असून, आमदारांना स्पेशल विमानातून हैदराबादला पाठवलं गेलं आहे. शिवाय, अशीही माहिती समोर येत आहे की जेएमएमचे काही आमदार नॉटरिचेबल आहे, त्यांचा फोन बंद येत आहे.

JMM and Congress MLAs left for Hyderabad
Hemant Soren News: 1300 किलोमीटरचा प्रवास, तब्बल 40 तास बेपत्ता...; 'असा' दिला सोरेन यांनी ईडीला गुंगारा!

नेमकं प्रकरण काय ?

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी(ED)ने सोरेन यांची 20 जानेवारी रोजी रांचीमध्ये चौकशी केली होती. त्यानंतर त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार होती. त्यावर सोरेन यांनी 29 जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी वेळ दिला होता. पण हेमंत सोरेन हे 27 जानेवारीला रांचीवरून दिल्लीला गेले होते.

29 जानेवारी रोजी ईडीचे अधिकारी सोरेन यांची चौकशी करण्यासाठी सकाळी 7 वाजताच त्यांच्या दिल्ली येथील शांतीनिकेतन निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र, त्या दिवशी सोरेन त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यांच्या कार्यालयातही ते नव्हते. ईडीचे अधिकारी तब्बल 13 तास सोरेन यांच्या घर आणि कार्यालयात तळ ठोकून होते.

ईडीची कारवाई

हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या चौकशीसाठी ईडीची अधिकारी सोरेन यांच्या घरी आले असता सोरेन हे बेपत्ता झाले होते. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोरेन यांच्या मालमत्तावर छापेमारी केली. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी 36 लाख रुपये रोख रक्कम आणि 1.3 कोटी रुपये किंमतीची BMW X7 ही लक्झरी कार ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोरेन यांच्या वाहन चालकांची ही चौकशी करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून फारशी माहिती मिळाली नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com