Kamala Harris: कमला हॅरीस यांनी भारतातील लहानपणीच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाल्या...

Kamala Harris Diwali in India : भारतात लहानपणी आई आणि बहिणीसोबत दिवाळी कशाप्रकारे साजरी करायच्या, याबाबतही सांगितले आहे.
Kamala Harris
Kamala HarrisSarkarnama
Published on
Updated on

US Election 2024: अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरीस हे दोघेही या निवडणुकीतील विजयासाठी संपूर्ण ताकद लावताना दिसत आहेत. याच दरम्यान डेमोक्रेटिक पार्टीच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांनी आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा दिला आहे. एका लेखांत वारंवार त्यांनी भारतात जाणे आणि कॅन्सर बरा करण्यासाठीची आपल्या आईच्या कठीण परिस्थितीचे स्मरण केले आहे.

कमला हॅरीस यांनी म्हटले की, जसे जसे आम्ही मोठे होत गेलो, माझी आई मला व माझ्या बहिणीला आपल्या परंपरेचा सन्मान करणं शिकवत होती. त्यांनी सांगितले की जवळपास दर दुसऱ्या दिवशी आम्ही दिवाळीसाठी भारतात जायचो. आमच्या आजी-आजोबा, काका आणि अन्य लोकांसोबत वेळ घालवत होतो. हॅरीस यांनी एका ऑनलाइन चॅनल द जॅगरनॉटला लिहिलेल्या पत्रात हे म्हटलेलं आहे.

Kamala Harris
Nitish Kumar : नितीश कुमारांनी धरले भाजपच्या माजी खासदाराचे पाय; VIDEO व्हायरल, कारण आले समोर...

कमला हॅरीस यांनी हेही सांगितले की,माझ्या घरी दिवाळी समारंभाचा पाहुणचार करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब राहिलेली आहे. केवळ सुट्टी घालवण्यासाठीच नव्हे, तर दक्षिण आशियाई अमेरिकी प्रवाशांच्या समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी हा दिवस अतिशय भावूक होता.

Kamala Harris
Priyanka Gandhi : मतदानाआधीच प्रियांका गांधींनी सुरू केले काम; राहुल गांधींनी वाचून दाखवली यादी

५ नोव्हेंबरच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तीन दिवस आधी हॅरीस यांनी लिहिले की, १९ वर्षांच्या वयात त्यांची आई श्यामला हॅरीस यांनी एकटीनेच भारत ते अमेरिका प्रवास केला.त्यांनी लिहिले की, माझ्या आईच्या जीवनात दोन उद्दिष्ट होती, आपल्या दोन मुली, माझी बहीण माया आणि माझं संगोपन करणं आणि ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार करणं. जेव्हा मी छोटी होते, तेव्हा आम्ही भारतभर फिरायचो, तेव्हा आम्ही आमचे आजोबा पी.वी.गोपालन यांनाही भेटायला जायचो. माझा आजोबा एक सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी होते.

याशिवाय हॅरीस यांनी पुढे सांगितले की, माझे आजोबा सकाळी आपल्या सेवानिवृत्त मित्रांसोबत समुद्रकिनारी फिरायला जात असत. त्यांनी म्हटले की, मी देखील त्यांच्याबरोबर जात असत आणि लोकशाही आणि नागरी अधिकारांसाठी लढण्याच्या महत्त्वाबाबत गोष्टी ऐकत असत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com