Kapil Sibal News : केंद्र सरकारच्या विरोधात कपिल सिब्बल मैदानात; केली मोठी घोषणा

ED News : ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची केंद्र सरकारवर टीका
Kapil Sibal News
Kapil Sibal NewsSarkarnama
Published on
Updated on

Kapil Sibal News : इडीचा वापर, विरोधकांना संपवण्यासाठी होत, असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजप सरकारमधील किंवा पक्षातील कोणत्याही नेत्याच्या विरोधात इडीने काहीच कारवाई केली नाही, असे सांगत ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार निशाणा साधला.

विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपल जात आहे. जे लोक इडीच्या (ED) केसमध्ये अकडले होते, ते लोक भाजपमध्ये (BJP) गेले त्यांच्यावरील केसेस बंद करण्यात आल्या. भाजप विरोधात देशभरात एक आंदोलन सुरु झाले पाहिजे. त्यासाठी सर्व राज्य सरकारांनी एकत्र आले पाहिजे. मला राज्य सरकारांनी बोलावले तर मी तेथेही जाईल, असेही सिब्बल यांनी सांगितले.

Kapil Sibal News
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक; कोल्हापुरात पाटलांनी काढला धडकी भरवणारा मोर्चा

जगात अनेक देशांध्ये सरकार विरोधात वकीलांनी आवाज उठवला आहे. मात्र, देशातील वकील बोलत नाहीत, ते का बोलत नाहीत, असा सवाल सिब्बल यांनी केला. देशातील वकिलांनी एकत्र येवून आपला आवाज उठवला पाहिजे. मला वकिलीमध्ये ५० वर्ष झाले आहेत. त्यामुळे देशातील वकिलांनी एकत्र येवून एक आंदोलन सुरु केले पाहिजे, असे सिब्बल म्हणाले.

आम्ही एक वेबसाईट सुरु केली आहे. त्या वेबसाईटचे नाव आहे, 'इसाफ के सिपाई' नावाने वेबसाईट सुरु केली आहे. या माध्यमातून आंदोलन करणार आहे. २०१४ च्यानंतर देशात आठ सरकारने पाडली. मेघालय, मनीपूर, गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील सरकारे, पाडली आहेत. देशातील निवडणून येणारी सरकारे पाडली जात आहेत. न्यायालय आणि जनता शांत आहे. देशातील मुठभर लोकच श्रीमंत आहेत, असे कपील सिब्बल म्हणाले.

आम्ही देशाला कोणत्या रस्त्याने घेऊन जात आहोत. देशात गरीबी वाढली आहे, असा आरोपही सिब्बल यांनी केला. कोणाच्या विरोधातही इडीचा वापर केला जात आहे. इडी कुठेही जाऊ शकते, त्यामुळे इडीच्या माध्यमातून लोकांना धमकावले जात आहे. देशातील विरोधी पक्षाच्या १२१ नेत्यांच्या विरोधात इडीने कारवाई केली. ज्या लोकांवर इडीच्या केसेस होत्या, ते लोक भाजपसोबत आले. त्यांच्यावरील खटले मागे घेतले गेले, असे सिब्बल यांनी सांगितले.

विरोधी पक्षांनीही मला साथ द्यावी. आपण भाजप विरोधात भक्कम आघाडी उभी करू, असे आवाहन सिब्बल यांनी केले. आता देशातील लोकांना जागृत करण्याची वेळ आली आहे. अन्यायाच्या विरोधात लढण्याची गरज आहे. विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री, नेत्यांनी मला साथ द्यावी. आपण राष्ट्रीय मोहीम सुरू करू, येत्या 11 मार्च रोजी नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर एक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला देशातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले जाणार आहे, असेही सिब्बल यांनी सांगितले.

Kapil Sibal News
Arvind Kejariwal : केजरीवाल म्हणतात, आठ कोटीचं घबाड भाजप आमदाराच्या घरात अन् अटक मनीष सिसोदियांना

सरकार विरोधात आवाज उठवला तर कारवाई केली जाते. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते. देश आज संविधानावर न चालता धर्मावर चालला आहे. त्यामुळेच आता जनतेला जागृत करणअयाची असल्याचेही सिब्बल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com