Karnataka Election Result : पंतप्रधान मोदींनी ज्या मतदारसंघात प्रचार केला, तिथे भाजपची काय परिस्थिती ?

Karnataka Assembly Election Result 2023 : मोदींनी जिथे सभा घेतल्या तिथे भाजप उमेदवार जिंकले का?
Karnataka Assembly Election Result 2023 :
Karnataka Assembly Election Result 2023 : Sarkarnama

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे कल येत आहेत. या ताज्या निकालाच्या कलानुसार कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाने जोरदार पुनरागमन केले आहे. कर्नाटकच्या कानडी जनतेने भाजपला सपशेल नाकारले आहे. तर काँग्रेसला पुर्ण बहुमतात सरकार बनवण्याची संधी दिली आहे. ताज्या कलांनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे. (PM Narendra Modi News)

Karnataka Assembly Election Result 2023 :
Karnataka Election 2023: बंडखोरी, 'ऑपरेशन लोटस'च्या धक्क्यानंतर काँग्रेसचा मोठा विजय; काय घडलं होतं २०१९ मध्ये?

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराबाबबत बोलायचे झाले तर, या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जनतेला आपल्या मुद्द्यांकडे आकर्षित करण्यासाठी अनेक रॅली आणि जाहीर सभा घेतल्या. जनतेला अनेक आश्वासने आणि दावेही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभा आणि जाहीर सभा पार पडल्या. या नेत्यांनी कर्नाटकात विविध मतदारसंघात सभा घेतल्या.

Karnataka Assembly Election Result 2023 :
Karnataka Election Result: कर्नाटकचा कोणताही परिणाम नाही; जे उत्तर प्रदेश जिंकतात तेच देश जिंकतात; फडणवीसांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 रॅली आणि सहा रोड शो केले :

भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदी कर्नाटक निवडणुकीत सर्वाधिक सक्रिय राहिले. 29 एप्रिल ते 7 या दरम्यानच्या काळात मोदींनी सात दिवस प्रचार केला. पंतप्रधानांनी राज्यातील 31 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये रॅली आणि रोड शो केले. मोदींनी या काळात 18 रॅली आणि सहा रोड शो केले. मोदींनी रोड शोद्वारे विधानसभेच्या 28 मतदारसंघ पिंजून काढले. म्हैसूर येथील प्रसिद्ध श्रीकांतेश्वर मंदिरात दर्शन घेऊन मोदींनी आपल्या निवडणूक प्रचाराची सांगता केली. गृहमंत्री अमित शहा यांनी 16 रॅली तर 20 रोड शो केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षासाठी पूर्ण ताकद लावली. शाह यांनी 21 एप्रिल ते 7 मे असे नऊ दिवस कर्नाटक राज्यात प्रचार केला. त्यांनी 31 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये रॅली आणि रोड शो केले. ज्यामध्ये 16 रॅली आणि 20 रोड शो यांचा समावेश आहे.

Karnataka Assembly Election Result 2023 :
Karnataka Election Result : "राहुल गांधींच्या 'भारत जोडो' चा करिश्मा; ज्या ज्या ठिकाणी यात्रा, तिथे काँग्रेस..."

मोदींनी जिथे प्रचार केला तिथली परिस्थिती काय?

पीएम मोदींनी बीदरच्या जागेवर भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता, पण मोदींच्या करिष्म्याचाही या जागेवर फारसा प्रभाव झालेला नाही. या जागेवरून काँग्रेस उमेदवार रहीम खान आघाडीवर आहेत. दुसरीकडे, विजापूरमधून भाजपचे यत्नल आघाडीवर आहेत. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. कोलार गोल्ड फिल्ड विधानसभा जागेवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. या सर्व जागांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com