Karnataka Election Result: कर्नाटकचा कोणताही परिणाम नाही; जे उत्तर प्रदेश जिंकतात तेच देश जिंकतात; फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Karnataka Election Result: "कर्नाटकचं उदाहरण देऊन काहीजण देश जिंकल्यासारखं सांगत आहेत"
Devendra Fadnavis on Karnataka Election Result
Devendra Fadnavis on Karnataka Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसला 224 जागांपैकी जवळपास 135 पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला फक्त 63 जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

कर्नाटकात भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. मात्र, तरी देखील भाजपला एवढं यश मिळवता आलं नाही. या निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis on Karnataka Election Result
Jalandhar By Election: अरविंद केजरीवालांचा काँग्रेस-भाजपला दणका; लोकसभेच्या पोटनिवडणुकीत 'आप'चा दणदणीत विजय

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "2018 ला भाजपच्या 106 जागा निवडून येत आम्हाला 36 टक्के मत मिळाले होते. आता या निवडणुकीत भाजपला 35.06 टक्के मतं मिळाली. त्यामुळे भाजपची 0.4 टक्के मतं कमी झाली. तर 2018 ला काँग्रेसला 38 टक्के, जेडीएसला 18 टक्के मतं मिळाली होती. आता जेडीएसची 5 टक्के मतं कमी झालेत. जेडीएसची ही मतं काँग्रेसला मिळाले. त्यामुळे काँग्रेसला त्याचा फायदा झाला. मात्र, भाजपची मतं कुठंही कमी झालेले नाहीत", असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis on Karnataka Election Result
Karnataka Election Result: कर्नाटकच्या जनतेला दिलेली पाच वचनं पहिल्या कॅबिनेटमध्ये पूर्ण करणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

"कर्नाटकचं उदाहरण देऊन काहीजण देश जिंकल्यासारखं सांगत आहेत. पण त्यांना माझा सल्ला आहे. उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल देखील आजच समोर आलेत. येथे भाजपची एकहाती सत्ता आली आहे. असं म्हणतात जे उत्तर प्रदेश जिंकतात ते देश जिंकतात. त्यामुळे कर्नाटकाच्या निवडणुकीचं उदाहरण देऊन देश जिंकल्या सारखं सांगण्यात कोणताही अर्थ नाही. कर्नाटकच्या निवडणुकीचा कोणताही परिणाम देशात आणि महाराष्ट्रात होणार नाही", असंही ते म्हणाले.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com