Rahul Gandhi Caste: 'राहुल गांधी मुस्लिम आहेत की ख्रिश्चन? हे..' ; भाजप आमदाराचं मोठं विधान!

BJP MLA question on Rahul Gandhi Caste: एवढंच नाहीतर राहुल गांधींच्या ब्राह्मण असल्याच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Basangouda Patil Yatnal on Rahul Gandhi : कर्नाटकचे भाजप आमदार बसंगौडा पाटील यतनाल यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जात आणि समुदायावर प्रश्न उपस्थित करून नवीन वाद निर्माण केला आहे. अशातच दिलेल्या एका प्रतिक्रियेत यतनाल यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं असून, यावर मोठ्याप्रमाणात टीका-टिप्पणीही होत आहे.

बसंगौडा पाटील यतनाल यांन आपल्या भाषणात राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आणि प्रश्न उपस्थित केला की, ते मुसलमान आहेत की ख्रिश्चन?. यतनाल म्हणाले, आज राहुल गांधी अमेरिकेत जावून देशविरोधी विधानं करत आहेत. ते जातींचे सर्वेक्षण करू इच्छित आहेत. परंतु त्यांना हेही नाही माहीत की ते कोणत्या जातीत जन्मले आहेत. त्यांना नाही माहीत की त्यांचा जन्म मुस्लिमांमध्ये झाला की ख्रिश्चनांमध्ये?

Rahul Gandhi
Haryana Assembly Election On Congress : हरियाणा जिंकायचंच, काँग्रेसकडून स्टार प्रचारकांसह अनुभवी निरीक्षकांची नियुक्ती

बीजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजप(BJP) आमदार यतनाल यांनी राहुल गांधी यांची खरी वंशावळ माहीत होण्यासाठी चौकशीची मागणी केली आहे. एवढच नाहीतर त्यांनी राहुल गांधींच्या ब्राह्मण असल्याच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

यतनाल यांनी म्हटले की, जर ते ब्राह्मण असल्याचा दावा करत आहेत, तर मग ते कोणते ब्राह्मण आहेत? ते जानवंधारी ब्राह्मण आहेत का? ते कोणत्या प्रकारे ब्राह्मण आहेत? तसेच यतनाल यांनी राहुल गांधी यांची तुलना देशी पिस्तुलाशाही केली आणि सूचवले की त्यांची उपस्थिती देशासाठी सकारात्मक योगदान देत नाही.

Rahul Gandhi
Ramdas Athawale News : राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आला; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

जात जनगणनेबाबत राहु गांधी यांची भूमिका -

राहुल गांधी देशभरातील जात जनगणनेचे मोठे समर्थक आहेत. काँग्रेसने(Congress) सामाजिक-आर्थिक जात जनगणना करण्याचे आश्वासनही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात दिले होते. राहुल गांधींच्या प्रस्तावाचा उद्देश जर त्यांचा पक्ष सत्तेत आल्यास, विविध जाती, उपजाती आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितींची गणना करणे आहे,

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com