karnataka cm ही ‘पेमेंट सीट’ आहे का ? सिद्धरामय्यांचा सवाल

आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ (basangouda patil yatnal) यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी एका व्यक्तीने दोन हजार ५०० कोटी रुपयांची मागणी केली होती
basangouda patil yatnal
basangouda patil yatnalsarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : karnataka cm मुख्यमंत्रिपद ही ‘पेमेंट सीट’ आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. कर्नाटकच्या (karnataka cm) मुख्यमंत्रिपदाची जागा भाजपने इच्छुक उमेदवारांना पैशाच्या बदल्यात देऊ केली आहे काय, असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील सर्वोच्च पदासाठी लाच देण्यासाठी सत्तेच्या दलालांशी संपर्क साधल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही सिद्धरामय्या यांनी केली.

सत्ताधारी पक्षाचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ (basangouda patil yatnal) यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी एका व्यक्तीने दोन हजार ५०० कोटी रुपयांची मागणी केली होती, तसे स्फोटक वक्तव्य यत्नाळ यांनी शुक्रवारी केली होते. बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना ही मागणी त्यांनी केली आहे.

basangouda patil yatnal
आढळरावांच्या 'होम स्पीच' वर राष्ट्रवादीच्या नेत्याची तुफान फटकेबाजी ; चर्चांना उधाण

हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगत सिद्धरामय्या म्हणाले की योग्य तपासामुळेच सत्य समोर येईल. मुख्यमंत्रिपद ही ‘पेमेंट सीट’ आहे का, असा त्यांनी सवाल केला. भाजपचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केलेल्या स्फोटक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते पुढे म्हणाले , "यत्नाळ यांना दिल्लीतील काही लोकांनी संपर्क साधून अडीच हजार कोटी रुपयांच्या बदल्यात राज्याचे मुख्यमंत्रिपद देऊ केले. हे फारच गंभीर आहे. यत्नाळ यांनी मात्र कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र फसवणूक करणाऱ्या कंपन्या असल्याचे सांगितले होते,"

basangouda patil yatnal
महाविकास आघाडीची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार ? उद्धव ठाकरे की शरद पवार..

'मला कर्नाटकचे मुख्यमंत्री (karnataka cm) बनण्याची ऑफर देण्यात आली होती. त्या बदल्यात त्यांनी मला २५०० कोटींची व्यवस्था करण्यास सांगितले,' असा दावा माजी खासदार आणि विजयपुरा शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांनी केला. कर्नाटकातील भाजप आमदाराने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली. यत्नल यांच्या दाव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. कर्नाटकात प्रत्येक कामासाठी दर ठरवल्याचा आरोपही केला.

लिंगायत पंचमसाली समाजाच्या अधिवेशनात यत्नल यांनी हा दावा केला आहे. "नवी दिल्लीतील काही लोक माझ्याकडे २५०० कोटी रुपये भरल्यास त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर घेऊन आले होते. त्यांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटींचे आश्वासन दिले होते.” असे यत्नल म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com